अनिल परब यांनी म्हाडाची जमीन बळकावली; सोमय्यांची लोकायुक्तांकडे तक्रार

अनिल परब यांनी म्हाडाची जमीन बळकावली; सोमय्यांची लोकायुक्तांकडे तक्रार

अनिल परब यांनी म्हाडाची जमीन बळकावली; सोमय्यांची लोकायुक्तांकडे तक्रार

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर म्हाडाची जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी लोकायुक्तांकडे केली आहे. सोमय्या यांच्या याचिकेची दखल घेत लोकायुक्त कार्यालयाने महाराष्ट्र सरकार, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, म्हाडा यांच्या कडून अहवाल मागवला आहे. याबाबतची माहिती किरीट सोमय्या यांनीच ट्विट करुन दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत अनिल परब यांच्या विरोधात म्हाडाची जमीन बळकावल्या प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे. अनील परब यांनी म्हाडाची जमीन बळकावली तसंच अनधिकृत कार्यालय बांधली आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या हे सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करत आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून लोकायुक्त कार्यालया काय माहिती देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

किरीट सोमय्या यांनी याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोरलाई जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता अनिल परब यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप केले आहेत. दरम्यान, याआधीच मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझेने पत्र लिहून अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जून, ऑगस्ट २०२० मध्ये SBUT ट्रस्टीकडून ५० कोटी गोळा करण्याचा आरोप अनिल परब यांच्यावर करण्यात केला. जानेवारी २०२१ मध्ये मुंबई महापालिका कंत्राटदाराकडून २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्याचाही आरोप केला आहे.

 

First Published on: April 21, 2021 9:57 AM
Exit mobile version