मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती लपवली; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती लपवली; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक पत्रात संपत्ती लपवल्याचा आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे आता शिवसेना विरुद्ध किरीट सोमय्या वाद चिघळण्याची चिन्ह आहेत. कारण यााधी सोमय्या यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान, आता किरीट सोमय्या यांनी आरोपांचा मोर्चा मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे वळवला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक पत्रात संपत्ती लपल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला दिली आहे. “राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नीच्या नावे अलिबाग मध्ये असलेली ५ कोटी रूपयांची संपत्ती माहित असूनही ती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दाखवली नाही. मी स्वत: या प्रकरणाचा जाऊन तपास केला. महाराष्ट्रातील भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी बलदेवसिंग यांच्याकडे भाजपने तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांनी जाणूनबुजून आपली ही संपत्ती लपवली आहे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही केली आहे,”

शिवसेनेने सोमय्यांना दिला कारवाईचा इशारा

किरीट सोमय्या सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्याने शिवसेनेने सोमय्या यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांमुळे ठाकरे कुटुंबाच्या प्रतीमेला तडा जात असून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी तयारी शिवसेनेने केली आहे. “ही मंडळी बेफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते आणि माझ्या कुटुंबासोबत तेच केलं. हिंमत असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा, आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्यानं मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही. हे मी आधीच सांगितलं आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

 

First Published on: January 11, 2021 7:17 PM
Exit mobile version