Kirit Somaiya : आणखी एका घोटाळ्याची माझ्याकडे माहिती, किरीट सोमय्यांचा दावा

Kirit Somaiya : आणखी एका घोटाळ्याची माझ्याकडे माहिती, किरीट सोमय्यांचा दावा

Kirit Somaiya : आणखी एका घोटाळ्याची माझ्याकडे माहिती, किरीट सोमय्यांचा दावा

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आणखी एक दावा केला आहे. घोटाळ्यांच्या मालिकात आणखी एक घोटाळा समोर आला असून त्याची माहिती देखील माझ्याकडे आहे. ती लवकरच सर्वांसमोर आणली जाईल असा इशारा भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तिन्ही घोटाळ्यांचा पुरावा आपल्याकडे असल्यामुळे मुश्रीफांना तुरुगांत जावं लागणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे मंत्र्यांचा आणि जावयांचा आर्थिक विकास करण्याचे धोरण आहे का? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, घोटाळ्यांच्या मालिकेमध्ये आणखी एक घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याची माहिती लवकरच सर्वांसमोर ठेवली जाईल. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटलं आहे. परंतु मुश्रीफांविरोधातील घोटाळा हा पुराव्यानिशी आहे. हसन मुश्रीफ यांना तुरुंगात जावंच लागणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. बेनामी कंपन्या आणि शेल कंपन्यांच्याद्वारे मुश्रीफांच्या जावयांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. याबाबत हसन मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. ठाकरे सरकारने आधी दादागिरी केली, कोल्हापूरात जाण्यासाठी प्रतिबंध केलं, देवीचे दर्शन घेण्यापासून मला रोखण्यात आलं होते. परंतु कोल्हापूर दौरा यशस्वी झाला आहे.

शरद पवारांवर घणाघात

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यात ग्रामविकास ऐवजी नेत्यांच्या आर्थिक विकास आणि नेत्यांच्या जावयाचा आर्थिक विकास ही भूमिका घेतली आहे का? असा प्रश्न सोमय्यांनी केला आहे. हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून एकूण १५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याचे पुरावे ईडीकडे दिला असल्याचे सोमय्यांनी म्हटलं आहे.

हसन मुश्रीफांनी जबाबदारी घ्यावी

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी छोट्या छोट्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पैशांचा घोटाळा केला आहे. छोट्या छोट्या ग्रामपंचायतींचे पैसे बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या मुलाच्या आणि जावयाच्या खात्यात पाठवले आहेत. मी सर्व घोटाळा केला असून ही माझी जबाबदारी असल्याचे मुश्रीफांनी लेखी कळवावे असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे.

अडसूळांनी जेलमध्ये जाऊन उपचार घ्यावा

शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीची कारवाई सुरु आहे. घोटाळा केल्याप्रकरणी ईडी अडसूळ यांच्या घरी चौकशीसाठी गेली होती यावेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे. आनंदराव अडसूळ यांन ईडीच्या कारवाईतून हायकोर्टाने दिलासा दिला नाही. त्यामुळे त्यांनी जेलमध्ये जावं आणि बर वाटत नसेल तर ईडीच्या ताब्यातून रुग्णालयात जावं असे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : ‘आम्ही शेताच्या बांधावर होतो, तेव्हा त्या अमेरिकेत होत्या’; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेवर टीका


 

First Published on: October 1, 2021 3:32 PM
Exit mobile version