घरमहाराष्ट्र'आम्ही शेताच्या बांधावर होतो, तेव्हा त्या अमेरिकेत होत्या'; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेवर...

‘आम्ही शेताच्या बांधावर होतो, तेव्हा त्या अमेरिकेत होत्या’; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेवर टीका

Subscribe

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, या टीकेला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही शेताच्या बाधांवर होतो, तेव्हा त्या अमेरिकेत होत्या, अशी टीका धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचं नाव न घेता केली. तुम्ही कधीच तुमच्या काळात बांधावरती नव्हता, असं देखील धनंजय मुंडे म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. त्याच अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या. त्यांना माहित नाही या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात ११ वेळा ढगफुटी झाली. त्या प्रत्येकवेळी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आताच्या अतिवृष्टीतही मी मंत्रीमंडळ बैठकीला हजर न राहता बीडमध्ये रात्री लोकांच्या मदतीसाठी गेलो होतो. रात्री अनेक लोकांना पुरातून आम्ही बाहेर काढले,असं धनंजय मुंडे म्हणाले.

- Advertisement -

“अडचणीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर उभे होतो. त्यांना आम्ही अडचणीतून बाहेर काढत होतो. खरं तर परवाच्या कॅबिनेटला देखील नव्हतो. त्यादिवशीसुद्धा रात्रभर आम्ही जागून काढली काही गावं पावसात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी १२४ लोकं जे पाण्यात अडकून होते त्यांना बाहेर काढण्याचं काम केलं. टीका करणं सोपं आहे, असा टीकेचा विचार करत नाही. तुमची चांगली भावना असती तर तुम्ही तुमच्या काळात बांधावर दिसला असता,” असा पलटवार देखील धनंजय मुंडे यांनी केला.

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम्’ आरोग्य कवच विमा योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने ही आरोग्य योजना आणली आहे. शरद पवार यांच्या नावानं राज्यात वृद्धांसाठी आरोग्य योजना आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी ही मोठी घोषणा केली. ‘शरद शतम’ असं या योजनेचं नाव आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना काही टेस्ट मोफत देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

राज्यातील ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -