किसान सभेचा एल्गार; २० फेब्रुवारीला पुन्हा काढणार ‘लाँग मार्च’!

किसान सभेचा एल्गार; २० फेब्रुवारीला पुन्हा काढणार ‘लाँग मार्च’!

किसान सभा मोर्चा (सौजन्य-आज तक)

गेल्या वर्षी मुंबईत काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चने पुन्हा एल्गार पुकारला आहे. संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला होता. मात्र मागण्या मान्य होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने किसान सभेने पुन्हा मुंबईमध्ये २० फेब्रुवारी रोजी लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा पायी असा हा मोर्चा असणार आहे. यंदाच्या मोर्चात शेतकऱ्यांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट असल्याची माहिती किसान सभेने दिली. काल, सोमवारी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. २० तारखेला नाशिकहून निघणारा हा मोर्चा २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत धडकणार आहे.

वाचा – ऊस उत्पादकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सभेच्या कौन्सिल बैठकीत निर्णय

नाशिक येथे किसान सभेची कौन्सिल बैठकी पार पडली असून यामध्ये सरकारवर टीका करण्यात आली. गेल्या वर्षी लाँग मार्च मुंबईत धडकल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. परंतू त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याची भावना वाढल्यामुळे हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. यावेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देऊ नये, हा मुद्दाही घेण्यात आल्याची माहिती किसान सभेचे आमदार जे. पी. गावित यांनी दिली. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, डॉ. डी. एल. कराड आदी उपस्थित होते. किसान सभा यावेळी निर्णायक लढाईसाठी पुन्हा रस्त्यावर येणार असून विशेष म्हणजे यावेळी हा मोर्चा नाशिकमधील शालिमार येथून न जाता गावाबाहेरून जाणार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वाचा – पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या मुली करणार अन्नत्याग आंदोलन

लाँच मार्चमधील ठळक मुद्दे

First Published on: February 5, 2019 8:49 AM
Exit mobile version