घरमहाराष्ट्रऊस उत्पादकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस उत्पादकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Subscribe

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुण्यामध्ये स्वाभिमानी संघटना रस्त्यावर उतरली आहे. अलका चौक ते साखर आयुक्तालय दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत.

थकीत एफआरपी रक्कमेच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सोमवारी पुण्याच्या अलका चौक ते साखर आयुक्तालय दरम्यान मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. आज सकाळी पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अलका चौक येथे एकत्र आले होते. अलका चौकातून फर्ग्यूसन कॉलेज रोड या मार्गाने हा मोर्चा निघाला आहे. या मोर्चेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आहेत. त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकरीदेखील या मोर्चेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा – ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या कित्येक दिवसांपासून एफआरपीप्रमाणे उसाला दर द्यावे, अशी मागणी ऊस उत्पादकांकडून केली जात आहे. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांकडून ऊस घेतल्यानंतर १४ दिवसांमध्ये पैसे देणे बंधनकारक आहे. परंतु, शेतकऱ्यांना साखर कारखानदाऱ्यांकडून तुकड्या-तुकड्याने पैसे दिले जातात. याप्रकरणी राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु, तरही एफआरपीची थकबाकी मिळत नसल्यामुळे अखेर शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे.

हेही वाचा – सरकार साखर उत्पादकांच्या पाठिशी – मुख्यमंत्री

- Advertisement -

काय म्हणाले राजू शेट्टी?

‘कायद्यानुसार शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी मिळायला हव्यात. जर शेतकऱ्यांना कायद्यानुसार योग्य त्या गोष्टी मिळाल्या नाही तर जप्ती आणा’, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत ‘राज्यात एकूण ५,३०० कोटींची एफआरपी थकीत असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. ‘एकूण १८६ साखर कारखान्यांनी ही एफआरपी थकवली आहे. मुख्यमंत्री आणि सहकारमंत्री याबाबत उदासीण आहेत. त्यामुळे एफआरपी प्रकरणी योग्य निर्णय झाल्याशिवाय आपण मागे हटणार नाहीत’, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.


हेही वाचा – राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा – सुभाष देशमुख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -