किशोर सूर्यवंशी मार्ग परिसर १० जूनपर्यंत सील

किशोर सूर्यवंशी मार्ग परिसर १० जूनपर्यंत सील

प्रतिबंधित क्षेत्र

शहरात आणखी एक करोनाबाधित आढळल्याने सोमवारी (दि. २७) किशोर सूर्यवंशी मार्ग परिसरातील वृंदावन नगर, चित्रलेखा अपार्टमेंट परिसर सील करण्यात आला आहे. म्हसरुळ परिसरातील या प्रतिबंधित क्षेत्राचा नकाशा महापालिकेने जाहीर केला आहे. येत्या १० जूनपर्यंत हा परिसर सील राहील. तसेच येथील नागरिकांची आरोग्य तपासणी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हाती घेण्यात आली.
काही दिवसांपूर्वी शहरात गोविंदनगर जवळील मनोहरनगर, नवशा गणपती मंदिर, नाशिकरोड, सातपूर-अंबड लिंकरोड आणि समाजकल्याण कार्यालय परिसरात करोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रविवारी (दि. २६) किशोर सूर्यवंशी मार्ग परिसरात राहणारा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. हा २४ वर्षीय रुग्ण मुळचा सुरगाणा येथील असून प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून जिल्हा रुग्णालयात कार्यरत होता. जिल्हा रुग्णालयात पॉझिटिव्ह रुग्ण दाखल केले जातात. त्यातून त्याला संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे. हा रुग्ण किशोर सूर्यवंशी मार्गावरील वृंदावन नगरमधील चित्रलेखा अपार्टमेंटमध्ये राहतो. त्यामुळे या अपार्टमेंटला केंद्रस्थानी मानून महापालिकेने आजूबाजूचा परिसर सील केला आहे.

कोण आहे हा रुग्ण?

(फोटो प्रातिनिधिक आहे)

पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण सुरगाणा तालुक्यातील हातरुंडीजवळील तळपाड्याचा आहे. परंतु तो प्रभाग क्रमांक १ मधील चित्रलेखा अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होता. तो जिल्हा रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.
रुग्णाचा रुम पार्टनर रुग्णालयात; अन्य पाच जण होम क्वारंटाईन:
या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचा रुग्णाचा रुम पार्टनरला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रासाठी हे असतील नियम:

  1. या क्षेत्रातील व्यक्ती घर सोडून बाहेर येऊ शकणार नाही
  2. बाहेरचा कोणीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात जाऊ शकणार नाही
  3. अत्यावश्यक सेवेचा वापर या क्षेत्रातील व्यक्ती करु शकतील
  4. परिसरात बॅरिकेटिंग लावण्यात येतील, जेणेकरुन वाहने ये-जा करणार नाहीत
  5. या आदेशाचे पालन न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
  6. या क्षेत्रात पोलिसांकडून २४ तास करण्यात येईल पेट्रोलिंग

२७२ घरांमधील रहिवाशांची होणार वैद्यकीय तपासणी :

सौजन्य – रियूटर्स

म्हसरुळ परिसरातील नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्यांसाठी ३ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परिसरातील २७२ घरांमधील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यातील ७२ घरांमधील नागरिकांची तपासणी सोमवारी करण्यात आली. अजून २५० नागरिकांची तपासणी पुढील काळात करण्यात येणार आहे. या संपूर्ण परिसराचे सोमवारी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

सोमवार (दि.२७) च्या घडामोडी :

नाशिक शहरातील अशी आहे परिस्थिती :

First Published on: April 27, 2020 8:35 PM
Exit mobile version