गेल्या घरी सुखी रहा, किशोरी पेडणेकरांनी बंडखोरांना सुनावले

गेल्या घरी सुखी रहा, किशोरी पेडणेकरांनी बंडखोरांना सुनावले

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्याने अनेक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोविडकाळात दिलासा देणाऱ्या संयमी, सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांना गमावल्याचे महाराष्ट्राच्या जनतेला दुःख आहे, अशी भावना शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही व्यक्त केली. तसंच, गेल्या घरी सुखी रहा असा सल्ला देत त्यांनी बंडखोरांना सुनावले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्या भावूक झाल्या.  (Kishori pednekar slapped to rebel mla)

हेही वाचा – विधानसभेत विरोधी पक्षनेते कोण? अजित पवार की जयंत पाटील?

शिवसेनेविरोधात बंड पुकारून एकनाथ शिंदे यांनी पक्षात दोन गट तयार केले. दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे गटासोबत गेल्याने उद्धव ठाकरे अल्पमतात ठरले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, तीव्र चीड आणि वाईट वाटते आहे. ते म्हणतात आम्ही शिवसैनिक आहोत. मात्र केवळ सत्तेसाठी तुम्ही हे केले. उद्भवजींसोबत जनता आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे जात राहील, त्यासाठी असे बंड गरजेचे होते का, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

हेही वाचा – फडणवीस, शिंदे यांचा आज सायंकाळी शपथविधी; कोण-कोण घेणार शपथ?

त्या पुढे म्हणाल्या की, राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांच्या विचारांना फाटा दिला. संजय राऊत म्हणतात ते बरोबर आहे. स्वतः मुख्यमंत्री बनवून दाखवा. चांगले चाललेले घर तुम्ही मोडून काढले. ईडी लागली म्हणून भाजपा हवी. भाजपासोबत असताना तुमच्या याच कुरबुरी होत्या, असा आरोप त्यांनी बंडखोरांव करत आता गेल्या घरी सुखी रहा, असे सुनावले.

First Published on: June 30, 2022 4:16 PM
Exit mobile version