घरमहाराष्ट्रविधानसभेत विरोधी पक्षनेते कोण? अजित पवार की जयंत पाटील?

विधानसभेत विरोधी पक्षनेते कोण? अजित पवार की जयंत पाटील?

Subscribe

शिंदे गटाने आपणच मूळ शिवसेना असल्याचा दावा केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचलेय. त्यामुळे उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकते. पण राष्ट्रवादीकडून हे पद कोणाला मिळणार याबाबतही साशंकता आहे

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 29 जून रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं महाविकास आघाडी सरकार पत्त्यासारखं कोसळलं. तिन्ही वेगवेगळ्या विचारधारेचे हे पक्ष एकत्र येत त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. पण ऐन वेळी 39 आमदारांना सोबत घेत शिंदेंनी केलेल्या बंडानं महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले आहे. त्यानंतर आता भाजप आणि शिंदे गट लवकरच सरकार स्थापन करणार असून, फडणवीस मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे सत्ता गेल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष आहे. विधानसभेत राष्ट्रवादीकडे 53 आमदार आहेत. शिवसेनेकडे 55 आमदार असले तरी 39 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे वेगळा मार्ग स्वीकारला होता. शिंदे गटाचे बंडखोरी केलेले आमदार भाजपबरोबर सरकार स्थापन करणार आहेत. शिंदे गटाने आपणच मूळ शिवसेना असल्याचा दावा केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचलेय. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकते. पण राष्ट्रवादीकडून हे पद कोणाला मिळणार याबाबतही साशंकता आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या आमदारांचे नेते अजित पवार असून, विधिमंडळाचे नेते जयंत पाटील आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासुद्धा जवळचे आहेत. त्यामुळे त्यांना ते पद मिळण्याची अपेक्षा आहे. पण अजित पवारही विधानसभेत राष्ट्रवादीचे अनुभवी आमदार आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्येही अजित पवारांचा वरचष्मा होता. उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद ही दोन्ही पदे अजित पवारांकडे होती. त्यामुळे अजित पवारांचा दबदबा पाहता त्यांचंही नाव चर्चेत आहे. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार हे लवकरच समजणार आहे.


हेही वाचाः एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना; राज्यपालांची घेणार भेट

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -