कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

मंगळवारी पहाटे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. हा अपघात पनवेलजवळ झाला आहे. या अपघातामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतील साखर कारखाना कर्जपुरवाठा विभागाचे व्यवस्थापक रणवीर चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे मूळ सांगीलचे असून ते ५१ वर्षांचे होते. त्यांच्या या अपघाती मृत्यूमुळे बँक कर्मचाऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

नक्की काय घडलं?

कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतील रणवीर चव्हाण हे खूप चांगले अधिकारी होते. जिल्हा बँकेच्या सुत्रानुसार, सोमवारी रात्री ते सरसेनापती संताजी घोरपडे आणि कारखान्याचे दोघे अधिकारी यांच्यासोबत मंत्रालयातील बैठकीसाठी मुंबईला निघाले होते. त्यांची आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी साखर कारखान्याच्या कर्जाबाबत मंत्रालयात बैठक होती. त्यामुळे ते प्रस्ताव घेऊन निघाले होते. मात्र यादरम्यान ट्रकला त्यांच्या कारने मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.


हेही वाचा – बोरघाटात टेम्पो अंगावर उलटून पाचजण जागीच ठार


 

First Published on: March 3, 2020 9:34 AM
Exit mobile version