आमचे नाना कदम लढले तर फेस आला, मी लढलो तर काय होईल; चंद्रकांत पाटलांचं पुन्हा चॅलेंज

आमचे नाना कदम लढले तर फेस आला, मी लढलो तर काय होईल; चंद्रकांत पाटलांचं पुन्हा चॅलेंज

ओपन चॅलेंज देण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा हात कोणी धरु शकत नाही. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर देखील चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा चॅलेंज दिलं आहे. “आमचे नाना कदम लढले तर फेस आला, मी लढलो तर काय होईल,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर हिमालयात जा अशा आशयाचे बॅनर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावले. त्यावर चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया दिलं. “आमचे नाना कदम आले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो तर काय होईल. मी असं म्हटलं होतो की मी लढलो आणि हरलो तर हिमालयात जाईन, मी अजून लढलोच नाही ना. आमचे नाना लढले. अक्षरश: तुमच्या तोंडाला फेस आला,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

जनतेनी दिलेला कौल मान्य

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. जनतेने दिलेला कौल मान्य आहे. “या निवडणुकीत नागरिकांनी दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे. कुठल्याही निवडणुकीत पराकष्टा करायची असते ती आम्ही केली. त्यानंतर ययश अपश आपल्या हातात नसतं,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकात पाटलांनी काय दिलं होतं चॅलेंज?

चंद्रकांत पाटलांनी दोन वर्षांपूर्वी एका सभेत बोलताना विरोधकांना चॅलेंज दिलं होतं. “कोल्हापूरमधून हे पळून आले आज चॅलेंज आहे आपलं. ज्याला कुणाला वाटतं त्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील कुठल्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा, पोटनिवडणूक लावायची, निवडून नाही ना आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


हेही वाचा – Kolhapur By Election : कोल्हापूरमधील विजय हा राज्यातील राजकारणाची पुढील दिशा ठरवणारा – बाळासाहेब थोरात


 

First Published on: April 16, 2022 2:27 PM
Exit mobile version