घरताज्या घडामोडीKolhapur By Election : कोल्हापूरमधील विजय हा राज्यातील राजकारणाची पुढील दिशा ठरवणारा...

Kolhapur By Election : कोल्हापूरमधील विजय हा राज्यातील राजकारणाची पुढील दिशा ठरवणारा – बाळासाहेब थोरात

Subscribe

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर महसूलमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना कोल्हापूरमधील विजय हा राज्यातील राजकारणाची पुढील दिशा ठरवणारा आहे, असं थोरात म्हणाले.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेस, महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे. सतेज पाटील आणि त्यांना साथ देणारे शिवसेना, राष्ट्रवादीचे नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी ज्या पद्धतीने एकत्रित काम केलं. त्याचं कौतुक निश्चित केलं पाहिजे. पुढील काळात राज्यातील राजकारणाची दिशा कशी ह राहील हे ठरवणारा हा विजय आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीने जनतेसाठी काम केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी काम केलेले आहे, त्याला जनतेने मतदान केलं आहे, असं थोरात म्हणाले.

- Advertisement -

भाजपने अनेक प्रलोभनं मतदारांना दाखवली जात होती. अनेकवेळा दमनशाही सुरु होती. परंतु, त्यामध्ये देखील निर्भीडपणे, स्वाभिमानी कोल्हापूरच्या जनतेने मतदान केलं त्याचं देखील अभिनंदन करतो, बाळासाहेब थोरात म्हणाले.

कोल्हापूरमध्ये भाजपला दणका

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या सत्यजीत कदम यांचा पराभव करत जयश्री जाधव कोल्हापुरातील पहिल्या महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान त्यांनी मिळवला. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं.

- Advertisement -

जयश्री जाधव यांनी सत्यजीत कदम यांचा १८ हजार ८०० मतांनी पराभव केला. जयश्री जाधव यांना २६ फेरीअखेर ९६ हजार २२६ मतं मिळाली. तर सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली.


हेही वाचा – Kolhapur By Election : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय, भाजपला दणका


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -