जयप्रभा स्टुडिओ खरेदीदाराच्या ऑफिसवर कोल्हापूरकरांकडून शाई फेक, तीव्र आंदोलनाचा इशारा

जयप्रभा स्टुडिओ खरेदीदाराच्या ऑफिसवर कोल्हापूरकरांकडून शाई फेक, तीव्र आंदोलनाचा इशारा

जयप्रभा स्टुडिओ खरेदीदाराच्या ऑफिसवर कोल्हापूरकरांकडून शाई फेक, तीव्र आंदोलनाचा इशारा

जय प्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाने आक्रमक भूमिका घेतली असून साखळी उपोषण सुरु केले आहे. कोल्हापूरकर आणि संघटनांनी जयप्रभा स्टुडिओच्या खरेदीदारांच्या ऑफिसवर शाई फेक केली आहे. या स्टुडिओची खरेदी रोनक शहा गुंडेशा आणि पोपट शहा आहेत. त्यांच्या कार्यालयावर संतप्त कोल्हापूरकरांनी शाई फेक करुन निषेध केला आहे. मराठी क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी शाई फेक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान हे प्रकरण आता चिघळत असल्याचे दिसत आहे.

जयप्रभा स्टुडिओची खरेदी झाली आहे. परंतु हा स्टुडिओ लवकरात लवकर परत करावा अशी मागणी या संघटनांनी आणि कोल्हापूरकरांनी केली आहे. शाई फेकची घटना समजल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या स्टुडिओच्या खेरेदीमध्ये स्थानिक शिवसेना नेत्यांच्या मुलांचा आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. जय प्रभा स्टुडिओ परत केला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शाई फेक करणाऱ्यांनी दिला आहे.

जय प्रभा स्टुडिओला वाचवण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महासंघाकडून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. हे उपोषण स्टुडिओच्या समोरच करण्यात आले आहे.

जय प्रभा स्टुडिओ मागील अनेक वर्षांपासून बंद पडला आहे. स्टुडिओ हजारो चित्रपटांचा समावेश आहे. स्टुडिओमधील काही इमारतींना हेरिटेज वास्तूचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच स्वर्गीय लतादीदींच्या नावे या स्टुडिओची जमीन आहे. परंतु कोरोना काळात ही जमीन गुप्तपद्धतीने स्टुडिओ खरेदी करण्यात आला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याविरोधात कोल्हापूरकरांनी संताप व्यक्त केला असून अनेक संघटनांनी विरोध केला आहे. खरेदी प्रक्रियेमध्ये शिवसेनेच्या आमदाराच्या मुलांचा आणि बड्या व्यापाऱ्याची भागिदारी असल्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : पुण्यात किरीट सोमय्यांच्या सत्कार प्रकरणी ३०० जणांवर गुन्हा दाखल, पोलिसांची धडक कारवाई

First Published on: February 13, 2022 5:42 PM
Exit mobile version