Konkan Railway : कोकण मार्गावर वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द; IRCTC वर संदेश

Konkan Railway : कोकण मार्गावर वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द; IRCTC वर संदेश

मुंबई : उन्हाळी सुट्टीपासून म्हणजेच मे महिन्यापासून ते गणपतीपर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यंत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. कोकणात जायचं असेल तर, सहज तिकीट मिळत नाही. त्याकरीता आगोदर तिकीट आरक्षित करावे लागते. मात्र, कोकण रेल्वे मार्गवार येणाऱ्या काही अडथळ्यांमुळे अनेक गाड्यात रद्द केल्या जातात. अशात, 10 जूननंतरची कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबात IRCTCच्या संख्येतस्थळावर संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे 10 जूननंतर कोकणात जाण्याकरीता तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामना करावा लागण्याची शक्यता आहे. (Konkan Railway Line Vande Bharat Tejas Canceled Message On Irctc)

मिळालेल्या माहितीनुसार, 10 जूननंतरची कोकणात जाणारी वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. याबाबात IRCTCच्या संख्येतस्थळावर संदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस रद्द झाल्याचा संदेश जरी IRCTC वर देण्यात आला असला तरी, गेल्या काही दिवसांपासून 10 जूननंतरची तिकिटे काढता येत नाही आहेत. त्यामुळे पावसाळ्यात कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार नसल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू झाली आहे.

हेही वाचा – Maharashtra Weather : मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा

दरम्यान,दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वे मार्गावर 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते. मात्र, रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण प्रवासाच्या 120 दिवस आधी सुरू होते. त्यामुळे कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रकानुसार होणारे बदलही आरक्षण प्रणालीत तेव्हाच नोंद होणे अपेक्षित आहे. मात्र, हे बदल न झाल्याने प्रवाशांना 10 जूनपासून ऑगस्ट महिन्यापर्यंतची तिकिटे आरक्षित करण्यास अडचणीचे ठरत आहे. परिणामी पावसाळ्यात कोकणात वंदे भारत धावणार की नाही, असा गोंधळ निर्माण झाला आहे.

सध्या 10 जूननंतरच्या कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेसची तिकीटं आरक्षित करता येत नाहीत. पण ही स्थिती अशीच राहिली तर पावसाळ्यात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुढील येत्या काही दिवसांत आगामी गणेशोत्सवासाठीचे रेल्वे आरक्षण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य आणि कोकण रेल्वेने लवकरात लवकर पावसाळी वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत करून सर्व रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू करण्याची मागणी प्रवाशी करत आहेत.


हेही वाचा – BEST BUS : प्रवाशांसाठी त्रासदायक! बेस्टकडून 700 एसी डबलडेकर बसचे कंत्राट रद्द

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 25, 2024 1:58 PM
Exit mobile version