घरताज्या घडामोडीMaharashtra Weather : मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather : मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा

Subscribe

राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आहे. अशात, आजही (25 एप्रिल) राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबई : राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आहे. अशात, आजही (25 एप्रिल) राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकिकडे अवकाळी पाऊस कोसळत असताना दुसरीकडे उष्णतेची लाट सुद्धा काही भागांत पाहायला मिळत आहे. त्यानुसार, मुंबई, ठाणेसह कोकणात तापमानात वाढ होणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Meteorological department warns of heat wave in Konkan including Mumbai Thane)

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळीवारा, गारपीट यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय, हवामान विभागाने कोकणात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढील 24 तासाता उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Raigad Water Crisis : पाणी योजना की पाणीटंचाईची योजना?

एकिकडे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये सातत्याने पावसाची रिमझिम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड परभणी, हिंगोली या भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. शिवाय, पुणे, अहमदनगर, जालना, जळगाव, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यासह इतर राज्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, पंजाब आणि हरियाणामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तरांडमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – Mumbai Heat Wave: काळजी घ्या! विकेंडला उकाडा वाढणार, मुंबईकर घामाघूम

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -