कामगार नेते बाबा आढव यांचं उपोषण स्थगित

कामगार नेते बाबा आढव यांचं उपोषण स्थगित

शिवनेरी रस्त्यावरील फळ विक्रेत्यांकडून अतिक्रमण शुल्क आकरण्याच्या निर्णयावरुन कामगार नेते बाबा आढव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालयासमोर उपोषणा बसले होते. मात्र, खासदार सुप्रीया सुळे यंनी मध्यस्थी करत बाबा आढाव यांनी उपोषण स्थगित करण्यास सांगितलं. सुप्रिया सुळेंच्या आश्वासनानंतर बाबा आढव यांनी उपोषण स्थगित केलं आहे.

शिवनेरी रस्त्यावर विक्रेते फळांची विक्री करत आहेत. या विक्रेत्यांकडून अतिक्रमण शुल्क आकारण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला होता. त्यासाठी ४०० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी एवढी रक्कम आकारण्यात येणार असल्याचं बाजार समितीने जाहीर केलं होतं. मात्र, ही रक्कम अमान्य असल्याचं सांगून कामगार नेते डॉ. आढाव यांनी उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान, आता सुप्रिया सुळे यांच्या मध्यस्थीने हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे.

बाबा आढव यांनी उपोष सुरु केल्याची माहिती सुप्रिया सुळे यांना मिळाली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आढाव यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांना फोन करुन या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. मधुकांत गरड बाबा आढव यांना भेटले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पुढील चर्चेसाठी बाजार समितीच्या कार्यालयात बोलवलं. भाडे आकारणीबाबत नंतर चर्चा करू, सध्या उपोषण मागे घ्या, अशी विनंती गरड यांनी केली.

 

First Published on: January 8, 2021 12:26 PM
Exit mobile version