करोना रुग्ण शोधणाऱ्या आरोग्यसेविकांची सुरक्षा ऐरणीवर

करोना रुग्ण शोधणाऱ्या आरोग्यसेविकांची सुरक्षा ऐरणीवर

करोना रुग्णांचा शोध घेणाऱ्या आरोग्यसेविकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे, रुग्णांचा शोध घेणाऱ्या सेविका मास्क, सॅनिटायझर्स सुरक्षात्मक किट्स पासून वंचित आहेत.

करोनाचा प्रसार रोखता यावा यासाठी महापालिका प्रशासन, सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. अशातच मुंबईतील आरोग्यसेविकांनाही करोना रुग्ण शोध मोहिमेचं काम देण्यात आलं आहे. आरोग्यसेविकांना घरोघरी जाऊन करोना रुग्ण शोधून त्याची माहिती पालिकेला द्यायची आहे. पण, असं असताना या आरोग्यसेविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेच्या आरोग्य सेविका करोनाचे रुग्ण शोधण्यासाठी अधिक वेळ काम करणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे चार हजार आरोग्य सेविका रविवारी आणि रोज अधिक वेळ प्रादुर्भाव झालेल्या देशातून मुंबई मध्ये आलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ही मोहिम सुरू करण्यात आली. रविवारी १५ मार्च रोजी चार हजार आरोग्य सेविकांनी मुंबई मध्ये शोध मोहीम केली. पण, या आरोग्यसेविकांना अजून सुरक्षात्मक किट्सपासून पुरवले गेले नाहीत ज्यात मास्क किंवा पीपीई किट्सचा समावेश आहे. त्यामुळे, त्यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण आहे.

सात महिन्यांपासून पगारवाढ नाही

सप्टेंबर २०१९ पासून चार हजार रुपये वाढ देण्याचे जाहीर केले मात्र अद्यापही वाढीव वेतन त्यांना देण्यात आले नसल्यामुळे आरोग्यसेविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पण, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने त्यांना सुट्टीच्या दिवशीही करोना बाधित रुग्णांचा शोध मोहीम सुरू ठेऊन मुंबईतील नागरिकांना सेवा देत असल्याचं आरोग्य सेविका संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देविदास यांनी सांगितलं.

First Published on: March 16, 2020 10:02 PM
Exit mobile version