पुण्यात लाखो लिटर पाणी वाया!

पुण्यात लाखो लिटर पाणी वाया!

पुण्यात लाखो लिटर पाणी वाया

पुणेकर मोठ्या प्रमाणात पाणी कपातीचा सामना करत असताना आज शहरातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. यामुळे पुण्यातील सिंहगड रस्ता आणि नवशा मारुती – चुन्नाभट्टी जवळील परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

१६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद

बेसुमार पाणी वापरणाऱ्या पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाने नुकताच दणका दिला असताना दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे पुण्यातील सिंहगड रस्ता आणि नवशा मारुती – चुन्नाभट्टीजवळील परिसर जलमय झाला आहे. गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्यानं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वती दरम्यानच्या १६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात येत होता. मात्र त्यात बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे उद्यानाच्या येथील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. तसेच जलकेंद्राच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्याचे वृत्त असून यामुळे परिसरातील आठ ते दहा घरांमध्ये पाणी देखील शिरले आहे.

चार फूट पाणी साचले

पर्वती जलकेंद्राला पाणी पुरवठा करणारे महापालिकेचे दोन पंप बुधवारी दुपारी तीन वाजता जलसंपदा विभागाकडून बंद करण्यात आले होते. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील रॉ – वॉटर व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. गेले २ तास हे पाणी वाहत होते. या बिघाडामुळे परिसरातील काही भागांमधील रस्त्यावर चा फूट पाणी साचले होते. त्यामुळे सिंहगड रस्ता आणि नवशा मारुती – चुन्नाभट्टीजवळील परिसर जलमय झाला आहे.


वाचा – पुण्यात पाणीकपात सुरु ; शहराला प्रतिदिन ११५० दशलक्ष लीटर पाणी

वाचा – पुण्यात पाणी जपून वापरा – गिरीश बापट


 

First Published on: January 17, 2019 10:37 AM
Exit mobile version