लातूरमध्ये ऊसाच्या शेताला आग; ३० एकर ऊस जळून खाक

लातूरमध्ये ऊसाच्या शेताला आग; ३० एकर ऊस जळून खाक

ऊसाच्या शेताला आग

लातूरमध्ये ३० एकर ऊस जळून खाक झाला आहे. आज दुपारी रेणापूर तालुक्यातील मौजे डिगोळ देशपांडे येथे ही घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमध्ये २१ शेतकऱ्यांच्या शेतातला ३० एकर ऊस जळून खाक झाला आहे. दरम्यान, या आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ऊसाचे शेत जळून खाक झाल्यामुळे शेतकरी चिंतेंत आले आहेत.

अशी लागली आग

रेणापूर तालुक्यातील मौजे डिघोळ देशपांडे इथे आज दुपारी एक ते दीडच्या दरम्यान गावालगत असणाऱ्ये एका उसाच्या शेतीला अचानक आग लागली. वारा जोरात असल्यामुळे ही आग इतरत्र पसरत गेली. यामुळे आसपासच्या शेतामध्ये असलेल्या ऊसाला देखील आग लागली आणि पाहता पाहता ३० एकर शेतातला ऊस जळून खाक झाला. आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीमुळे धुराचे लोट पाहून आजूबाजूच्या शेतकरी- ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग वाढत जात आसपासच्या शेतातला ऊस जळून खाक झाला.

आगीत महिलेचा मृत्यू

दरम्यान, ऊसाच्या शेतामध्ये काम करणाऱ्या एका शेतकरी महिलेचा आगीत होरपळून मृत्यू झाला. नागरबाई जोगदं असं या महिलेचे नाव आहे. ती शेतामध्ये काम करत होती. अचानक उसाला आग लागली आणि शेताच्या चारही बाजून आग पसरली आणि या आगीमध्ये होरपळून त्यांचा मृत्यू झाला. नागरबाई यांना ग्रामस्थांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले मात्र त्यापूर्वीचा त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, याआगीमध्ये उसाने भरलेली ट्रक्टरची ट्रॉली जळून खाक झाली.

First Published on: February 15, 2019 10:18 PM
Exit mobile version