Latur Rain Update : अवकाळी पावसामुळे लातुरकर हैराण; वीज पडून 2 क्तींसह 13 जनावरांचा मृत्यू

Latur Rain Update : अवकाळी पावसामुळे लातुरकर हैराण; वीज पडून 2 क्तींसह 13 जनावरांचा मृत्यू

लातूर : राज्यातील अनेक भागांत मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. एकिकडे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असताना दुसरीकडे 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latur Rain Update 13 animals including 2 died due to unseasonal rain)

लातूर जिल्ह्यात एकाच महिन्यात तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात चाकूर, निलंगा, औसा, रेणापूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रबी हंगामातील पिकांची काढणी झाल्याने धोका टळला असला तरी आंबा फळपिकासह भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी वीज कोसळून 13 जनावरे दगावली आहेत.

अवकाळी पावसामुळे दोघांचा मृत्यू

लातूरमधील चाकूर तालुक्यात अंगावर वीज पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. नळेगाव येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने सार्थक संतोष ढोले (21) हा जखमी झाला होता. त्यानंतर उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी सार्थकला मृत घोषित केले. तसेच, मंगलाताई अशोकराव पाटील (65) यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वेगमर्यादा पाळा अन्यथा भरा भुर्दंड

लातूर भागात मोठ्या प्रमाणात केशर आंब्याच्या बागा आहेत. परंतू,  जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे या बागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष बागेलाही या पावसाचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांनी अद्याप ज्वारी काढली नाही त्यांना या पावसामुळे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था तर अतिशय वाईट झाली आहे. मागील महिन्याभरात ही तिसरी वेळ गारपिटीची आहे. मागील दोन गारपीटीत शेतकऱ्यांचा मोठा प्रमाण नुकसान झालं होतं. गारपीटी तब्बल 200 हेक्टर शेत जमिनीवरच नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


हेही वाचा – School Time : सकाळी 9 वाजताची शाळा नको; शासन निर्णयाला पालकांचा विरोध

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 21, 2024 6:59 PM
Exit mobile version