घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरSchool Time : सकाळी 9 वाजताची शाळा नको; शासन निर्णयाला पालकांचा विरोध

School Time : सकाळी 9 वाजताची शाळा नको; शासन निर्णयाला पालकांचा विरोध

Subscribe

शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी शासनाने सकाळी भरणाऱ्या शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षण विभागाने सकाळी 9 नंतर शाळा भरविण्याचा निर्णय घेतला. पण या शासन निर्णयाला आता पालकांकडून विरोध होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी शासनाने सकाळी भरणाऱ्या शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षण विभागाने सकाळी 9 नंतर शाळा भरविण्याचा निर्णय घेतला. पण या शासन निर्णयाला आता पालकांकडून विरोध होत आहे. सकाळी 9 नंतर शाळा भरविल्यास कामाला जाण्यास उशीर होईल, परिणामी वेळेचे नियोजन करणे अशक्य आहे, असे कारण पालकांनी दिले आहे. त्यामुळे शासन पालकांच्या विरोधाची दखल घेत सकाळी 9 नंतर भरविण्याच्या शाळेच्या वेळेत काही बदल करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (School Time Students School Time New Rule From Education Department In Maharashtra)

राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या उद्घाटनावेळी शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार करावा, असे म्हटले होते. त्यावेळी राज्यातील शिक्षण विभागाने परिपत्रक काढत पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरविण्याचा निर्णय घेतला. पण शासनाच्या या निर्णयामुळे पालकांची तारांबळ उडाली आहे. कारण सकाळी लवकर शाळा भरल्यास मुलांचा जेवणाच्या डब्यापासून ते तो शाळेतून आल्यानंतरच्या जेवणापर्यंची सगळी व्यवस्था केली जाते.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Highway : विरार-अलिबागसह महाराष्ट्रात तयार होणार आणखी 2 नवीन महामार्ग

पण नवीन निर्णयामुळे मुलांना शाळेत सोडणे व नोकरीला जाण्याची वेळ एकच होऊ लागली आहे. त्यामुळे शाळा चालकांसह पालकांनी पूर्वीच्या वेळाच कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्याविषयीचा पत्रव्यवहारही शालेय शिक्षण विभागाशी केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्यस्थितीत छत्रपती संभाजीनगरमधील पालकांनी हा निर्धार केला आहे. आगामी काळात राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अशी मागणी झाल्यास शिक्षण विभाग शाळा भरविण्याच्या पूर्वीच्या वेळा कायम ठेवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, सध्या शालेय विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी सुरू आहे. मात्र, येत्या जून महिन्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. विशेष म्हणजे याच शैक्षणिक वर्षापासून शाळा भरविण्याचा वेळेत बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक पालकांमध्ये पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरविण्याच्या शासन निर्णयाची चिंता वाढली आहे.


हेही वाचा – Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वेगमर्यादा पाळा अन्यथा भरा भुर्दंड

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -