युती तुटल्यास स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन जोर धरणार

युती तुटल्यास स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन जोर धरणार

नेहमीच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा विरोध करणार्‍या शिवसेना पक्षाने 30 वर्षांची भाजपबरोबरची युती तोडलेली आहे. त्यामुळे विदर्भवादी नेत्यांमध्ये आता आनंदाची लाट उसळली असून विदर्भात फटाके फोडण्यात आले आहे.लवकरच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते आणि विदर्भवादी काही आमदारांचे शिष्टमंडळ लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य सयोजक राम नेवले यांनी देण्यात आली आहे.

अटल बिहारी वाजपेयींनी शिवसेनेच्या विदर्भ विरोधामुळे झारखंड, उत्तरांचल स्वतंत्र राज्ये दिली होती. परंतु, विदर्भ दिला नव्हता. 2014 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन विदर्भ जनतेला दिले होते. म्हणून विदर्भातून भाजपचे 44 आमदार निवडून दिले होते. त्यामुळेच भाजपची सत्ता महाराष्ट्रात बसली व विदर्भाचे देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री झाले होते.

याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील एकूण 123 भाजपा आमदारापैंकी 44 आमदार विदर्भाने निवडून दिलेले होते. मात्र शिवसेनेच्या विदर्भ विरोधामुळे गेली 5 वर्ष भाजपने विदर्भाचे नाव सुध्दा घेतले नाही. त्याचा परिणाम 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला आहे. तसेच विदर्भाने भाजपचे 15 आमदार कमी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते.

First Published on: November 13, 2019 5:32 AM
Exit mobile version