गाईच्या दुधात लम्पी व्हायरसचा काही प्रभाव आढळतो का? जाणून घ्या तज्ज्ञाचे मत

गाईच्या दुधात लम्पी व्हायरसचा काही प्रभाव आढळतो का? जाणून घ्या तज्ज्ञाचे मत

उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात लम्पी विषाणूचा कहर सातत्याने वाढत असताना दुसरीकडे त्याचा थेट परिणाम गायीच्या दुधावर आणि उत्पादनावर होताना दिसत आहे. आतापर्यंत, लम्पी विषाणू उत्तर प्रदेशातील 25 जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे, त्याचा सर्वाधिक प्रभाव मुझफ्फरनगर, सहारनपूर आणि अलीगढमध्ये दिसून येत आहे. राज्यात 15 लाखांहून अधिक गुरेढोरे याच्या विळख्यात आले असून, त्यापैकी 25 हजारांना थेट लागण झाली आहे.

लम्पी व्हायरसचा संसर्ग गायीच्या जीवनासाठी धोकादायक आहे. यासोबतच गाईचे दूध आणि गोमूत्र आणि शेणावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. या संदर्भात लखनौ विभागाचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञ अरविंद कुमार वर्मा यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला माहिती दिली.त्यांच्या म्हणण्यानुसार, गाईच्या दुधात लम्पी व्हायरसचा प्रभाव दिसून येतो आणि दुधातही विषाणूचे घटक आढळतात.

दूध जास्त काळ उकळणे आवश्यक  –

गाईच्या दुधात असलेले विषाणू देखील दूर केले जाऊ शकतात. यासाठी दूध जास्त वेळ उकळणे आवश्यक आहे. पाश्चरायझेशनद्वारे वापरले जाणारे दूध कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही. पाश्चरायझेशन झाल्यानंतर दूधात मानवासाठी कोणतेही हानिकारक घटक शिल्लक राहात नाहीत, परंतु हे दूध जर गाईच्या बछड्याने पिले तर ते त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा स्थितीत बछड्याला गाईपासून वेगळे ठेवावे.

लम्पी विषाणूचा गुरांच्या गर्भाशयावर परिणाम –

लम्पी विषाणूमुळे गायीचा मृत्यूदर कमी असला तरी त्याचा थेट परिणाम तिच्या दूध उत्पादनावर आणि गर्भाशयावर होतो. तज्ज्ञांच्या मते, हा रोग दुधाच्या उत्पादनावर परिणाम करतो, गायीचे दूध 50 टक्क्यांनी कमी होते. हा आजार आर्थिक नुकसान करणारा आजार आहे. यामध्ये मृत्यूचे प्रमाण १ ते २ टक्के आहे.

गायीच्या लाळेला किंवा रक्ताला दुसऱ्या प्राण्याचा स्पर्श झाल्यास प्रसार –

लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की लम्पी व्हायरसने ग्रस्त असलेल्या गायीच्या गोमूत्र आणि शेणात विषाणूचे घटक आढळत नाहीत का? यावर तज्ज्ञंनी मत नोंदवले आहे. विषाणूचा कोणताही धोका दिसत नाही. तसेच, जे लोक गोमूत्र किंवा शेण वापरतात त्यांच्यावर कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत, परंतु ते या विषाणूचे वाहक बनणार नाहीत याची काळजी  घेणे आवश्यक आहे. कारण गायीच्या लाळेला किंवा तिच्या संक्रमित रक्ताला दुसऱ्या प्राण्याने स्पर्श केल्यास, या रोगाचा संसर्ग होऊ शकतो.

लम्पी व्हायरसचा मानवाला धोका नाही –

लम्पी विषाणूचा मानवांना कोणताही धोका नाही, तो प्राण्यांपासून प्राण्यांमध्ये पसरतो. अशा स्थितीत जनावरांची लाळ आणि डास चावल्याने त्याचा प्रसार होतो. तज्ज्ञांचे असे मत आहे की, कडुलिंब किंवा हळद आणि तूप यांची पेस्ट जनावरांच्या  गाठींवर लावल्याने जखमा भरणे बंद होते आणि हा आजार झालेला प्राणी 1 आठवडा ते 10 दिवसात बरा होतो. परंतु यापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय लसीकरण आहे. महत्वाची पद्धत म्हणजे लसीकरण, ज्याद्वारे त्याचे संक्रमण वेगाने थांबवता येते.

संक्रमित जनावरांना पूर्णपणे वेगळे करणे आवश्यक –

लम्पी विषाणूचा संसर्ग रोखण्याबाबत, तज्ज्ञांचे असे मत आहे की संक्रमित प्राण्याला इतर प्राण्यांपासून वेगळे करणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. संसर्गाचा वेग वेगवान असला तरी गुरांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत शेतकरी व गोशाळा कर्मचाऱ्यांनी प्रथम संक्रमित गायीला उर्वरित जनावरांपासून वेगळे करून त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा हा संसर्ग इतर प्राण्यांमध्ये झपाट्याने पसरू शकतो.

First Published on: September 13, 2022 9:46 AM
Exit mobile version