देवळाली कॅम्प परिसरात बिबट्या जेरबंद 

देवळाली कॅम्प परिसरात बिबट्या जेरबंद 

नाशिक: बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

देवळाली कॅम्प परिसरातील मिलिटरी हद्दीत लावलेल्या पिंज-यात नर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. दारणा काठच्या गावांतील हा सहावा बिबट्या आहे.

देवळाली कॅम्प परिसरात गेल्या काही दिवसांपुर्वी बिबट्यांचा वावर दिसून आल्याने नागरिकांत दहशत होती, नागरिकांच्या मागणी प्रमाणे आर्मी जवान क्वार्टर, आर्टीसेंटर देवळाली येथे तीन दिवसांपुर्वी पिंजरा लावला होता. बुधवारी(दि.२९) सकाळी मिलिटरी अधिका-यांना पिंज-याचा दरवाजा बंद झालेला दिसल्यानंतर बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री झाल्यावर वनविभागाला माहिती दिली. नाशिक वनविभागाचे परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी व पथकाने पिंजरा ताब्यात घेत गंगापूर येथील रोपवाटीकेत नेण्यात आला. दरम्यान दारणा काठच्या गावांत दहशत माजविणा-या बिबट्यांपैकी आता पर्यंत सहा बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असले तरिही परिसरात बिबट्यांचे दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण आहे. पकडलेला बिबट्या नर असून दहा ते बारा वर्षाचा असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवानगी करण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले.

First Published on: July 29, 2020 12:18 PM
Exit mobile version