चिंचोलीत बिबट्या जेरबंद

चिंचोलीत बिबट्या जेरबंद

Leopards captured in Chincholi

दारणा नदी काठच्या गावातील चार बळी व अनेक हल्ले करणा-या बिबबट्यांनी धुमाकुळ घातला आहे. नाशिक, सिन्नर, निफाड, येवला, आदी पथकांसोबत मुंबई येथील संजय गांधी राष्टीय उद्यानातील दोन वेगवेगळ्या पथकांनी विविध प्रकारचे प्रयोग करुन जेरबंद करण्यासाठी कंबर कसली होती. गेल्या १५-२० दिवसांत चार बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
सिन्नर तालुक्यातील चिंचोली गावात गेल्या कित्येक दिवसांपासून बिबट्यांचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशत होती. गावाला लागूनच असलेल्या स्मशानभूमी परिसरात बिबट्यांचा वावर असल्याच्या तक्रारी पोलीस पाटलांनी सिन्नर वनविभागाचे अधिका-यांकडे केल्या नंतर मंगळवारी (दि.२१) दुपारी  महादू लहानू सानप यांच्या गट नंबर ३१ या शेतात पिंजरा लावला होता. बुधवारी (दि२२) पहाटे पिंज-याचा दरवाजा बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पोलीस पाटील मोहन यशवंत सांगळे, जि. प. सदस्य संजय सानप, राजाराम नवाळे यांनी वनविभागाचे प्रवीण सोनवणे यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्या सुचने प्रमाणे राजाराम उगले, साळवे यांनी बिबट्या ताब्यात घेऊन सिन्नरला नेण्यात आला आहे. दरम्यान या भागात अद्यापही दोन किंवा अधिक बिबटे असल्याने वनविभागाने अधिक पिंजरे लावण्याची मागणी जि. प. सदस्य संजय सानप यांनी केली.
First Published on: July 22, 2020 10:04 AM
Exit mobile version