LIC कर्मचाऱ्यांना मिळणार १६ टक्के पगारवाढ, पाच दिवसाचा आठवडा धोरणालाही मंजुरी

LIC कर्मचाऱ्यांना मिळणार १६ टक्के पगारवाढ, पाच दिवसाचा आठवडा धोरणालाही मंजुरी

LIC कर्मचाऱ्यांना मिळणार १६ टक्के पगारवाढ, पाच दिवसाचा आठवडा धोरणालाही मंजुरी

एलआयसी LIC कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एलआयसी कर्मचाऱ्यांना आता १६ टक्के पगारवाढ मिळणार आहे. याबाबत वित्त मंत्रालयाचा वित्तीय सेवा विभागाने परवानगी दिली आहे. या पगारवाढीचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच कंपनीतील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवडाही जाहीर करण्यात आला आहे. तसेच महागाई भत्ता (डीए) च्या १०० टक्के बेसिस पॉईंट्स कमी करण्याची १५ टक्के वाढीव वाढ देण्यात आली असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा धोरणालाही मंजुरी दिल्यामुळे आता एलआयसी कर्मचाऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शनिवारी आणि रविवारी सुट्टी असणार आहे. कर्मचारी संघटनांची अशी मागणी होती. तसेच अहवालात असेही म्हटले आहे की, एलआयसी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त विशेष भत्तादेखील लागू करण्यात आला आहे. हा भत्ता डीए नुसार मोजला जाईल. घरभाडे भत्ता (एचआरए), शहर भरपाई भत्ता (सीएसए), सशुल्क रजा जादू, ग्रेच्युटी, वेतन लाभ इत्यादींना लागू होणार नाही. विशेष भत्ता श्रेणी असेल दरमहा १,५०० ते १३,५०० रुपयांपर्यंत आहे.

एलआयसी कर्मचाऱ्यांची ३५ टक्के वेतवाढ करण्याची मागणी केली होती. परंतु केंद्र सरकारने १६ टक्के वेतनवाढ केली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातवाढ ही दर पाच वर्षांनी होत असते. दरम्यान २०१२ रोजी कर्मचाऱ्यांच्या वेतानत वाढ करण्यात आली होती. एलआयसी कर्मचाऱ्यांच्या मागण्या या २०१७ पासून प्रलंबित होत्या, तसेच केंद्र सरकार आयपीओ लॉन्च करण्याच्या विचरात असल्याचेही बोलले जात आहे.

First Published on: April 16, 2021 11:08 PM
Exit mobile version