लाईफलाईन एक्सप्रेस आता लातूरमध्ये

लाईफलाईन एक्सप्रेस आता लातूरमध्ये

लाइफलाइन एक्सप्रेस

देशातील विविध राज्यात जाऊन गरिबांवर उपचार करणारी लाईफ लाईन एक्सप्रेस आता लातूरमध्ये जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे प्रबंधक डी.के.शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मुंबईत दाखल झालेल्या आणि आता लातूरच्या दिशेने जाणाऱ्या या ‘लाईफ लाईन एक्सप्रेस’चे आज डी.के. शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

लातूरमध्ये 15 जून ते 6 जुलै एक्सप्रेसचा मुक्काम 

ही लाईफ लाईन एक्सप्रेस यंदा 15 जून ते जुलै म्हणजे ऐन पावसाळ्यात लातूरमध्ये असणार असून, लातूरकरांना या लाईफ लाईन एक्स्प्रेसचा फायदा घेता येणार असल्याची माहितीही शर्मा यांनी यावेळी दिली.

या आजारावर होणार उपचार 

या एक्स्प्रेसमध्ये विविध प्रकारच्या सर्जरी सोबत स्थन आणि गळ्याच्या कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर देखील उपचार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत. अद्ययावत यंत्र आणि तज्न डॉक्टर उपचार तसेच सर्जरी करणार आहेत.

या एक्स्प्रेस बद्दल थोडक्यात 

भारत सरकारने २७ वर्षांपूर्वी या या मोफत सेवेच्या लाईफ लाईन एक्सप्रेस ची सुरुवात केली. आतापर्यंत २० राज्यांमध्ये आरोग्य सेवेसाठी या लाईफ लाईन एक्स्प्रेसचा वापर करण्यात आलाय. ग्रामीण भागातील रुग्णाच्या उपचारासाठी ही सेवा सुरू करत साध्या तापापासून कॅन्सर सारख्या आजारावरही या एक्स्प्रेस मध्ये उपचार करण्यात आला आहे. १ लाख ३७ हजार सर्जरी आतापर्यंत या लाईफ लाईन एक्स्प्रेस मध्ये करण्यात आल्या आहेत. ९ डब्यांमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी या एक्स्प्रेसमध्ये अद्यावत यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

First Published on: June 5, 2018 3:35 PM
Exit mobile version