‘आम्हाला १०वी सूची लागू होत नाही’, सर्वोच्च निर्णयापूर्वी शिरसाटांचा दावा

‘आम्हाला १०वी सूची लागू होत नाही’, सर्वोच्च निर्णयापूर्वी शिरसाटांचा दावा

मुंबई | “आम्हाला १०वी सूची लागू होत नाही”, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) निकाल देणार आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.  शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करणार, विधानसभा उपाध्यक्ष झिरवळांचे वक्तव्य योग्य नाही, असे मतही शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

संजय शिरसाट म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात काय निकाल येईल, यांची आम्हाला देखील उत्सुकता आम्हाला ही आहे.  आम्ही न्यायालयात आमची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे. आम्ही घेतलेला निर्णय हा कायदेशीर आहे. कायदेभंग होईल, असे काम आम्ही केले नाही आणि आम्हाला १० वी सूची लागू होत नाही. त्यामुळे आम्हाला अपात्रतेचा प्रश्न येत नाहीत.” शिंदे गटातील १६ आमदार अपात्र होईल, असे विरोधकांची मागणी आहेत. परंतु, कधी व्हीप बजविला आणि याचे कारण काय?, या सर्व गोष्टींची चर्चा झालेली आहे. सभागृहामध्ये तुम्हाला पक्षाकडून जो व्हीप बजावला जातो. सभागृहात जर मतदान असेल, किंवा एखादे बिल सादर होणार असेल. त्यावेळी तुम्ही गैरहजर राहिलात, तर तुमच्यावर पक्षाकडून कारवाई होऊ शकते. तसे कोणतेही कारण तेथे घडलेले नाही. बहुमताच्या चाचणीला उद्धव ठाकरे समोरे गेलेले नाहीत. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेला आहेत. त्यामुळे बहुमत चाचणीचा देखील येथे संबंध येत नाहीत. कायदेशीर बाबी पाहिल्या तर सत्तासंघाचाच्या निकाल आमच्या बाजून येईल.” असे आम्हाला वाटते.

झिरवळांचे ‘ते’ वक्तव्य योग्य नाही

नरहरी झिरवळ यांच्याकडे संपूर्ण प्रकरण वर्ग करण्यात येईल, असे संजय राऊत म्हणाले, पत्रकारांच्या प्रश्नावर संजय शिरसाट म्हणाले, “संजय राऊत हे काही कायदेतज्ञ नाहीत. गेल्या १५ वर्षापासून ते झिरवळ हे माझ्यासारखे आमदार आहेत. सभागृहातील नियमांचा अभ्यास केला तर, हा सर्व अधिकार अध्यक्षकांकडे जातो. १६ आमदार अपात्र ठरवण्याचा निकाल माझ्याकडे आला तर मी त्यांना अपात्र ठरवेल, असे त्यांचे वक्तव्य चुकीचे आहेत. झिरवळांनी नियमाचे उल्लघंन केल्याचे स्पष्टपणे माध्यमांना सांगितले. झिरवळ हे उपाध्यक्ष जरी असले तरी असे वक्तव्य करण्याचा त्यांना अधिकार नाही”, असे शिरसाट म्हणाले.

 

 

First Published on: May 11, 2023 10:44 AM
Exit mobile version