पुण्यात विमानामध्ये सापडली जिवंत काडतुसं!

पुण्यात विमानामध्ये सापडली जिवंत काडतुसं!

स्पाइसजेट विमान

मोठ्या सुरक्षा व्यवस्थेनंतर देखील पुणे विमानतळावर थेट एका विमानामध्ये जिवंत काडतुसं नेण्यात एक प्रवासी यशस्वी झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी घडला आहे. यामध्ये नक्की चूक कुणाची होती, याची चौकशी सध्या विमानतळ सुरक्षा प्रशासन करत आहे. मात्र, ही काडतुसं नक्की विमानात का नेली गेली? ही काडतुसं कुठे नेली जात होती? पुन्हा मोठ्या हल्ल्याचा कट होता का? असे महत्त्वाचे गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

नक्की काय झालं?

गुरुवारी पहाटे साडे चारच्या सुमारास पुणे विमानतळावर नेहमीप्रमाणेच वेगवेगळ्या फ्लाइट्ससाठी प्रवाशांची ये-जा सुरू झाली. बंगळुरूला रवाना होणाऱ्या स्पाइसजेट विमानाचं बोर्डिंग झालं होतं. मात्र, अचानक एकच गलका झाला. सुरक्षा यंत्रणांनी अधिक तपासणी केल्यानंतर विमानातल्या एका प्रवाशाकडे तब्बल २२ जिवंत काडतुसं असल्याचं समोर आलं. .२२ कॅलिबर पिस्तुलाची ही २२ काडतुसं होती. त्यामुळे विमानतळ सुरक्षा प्रशासनाचे अधिकारी चांगलेच चक्रावले. सदर प्रवाशाकडे या काडतुसांच्या संदर्भातली वैध कागदपत्र मागितल्यानंतर त्याला तशी कोणतीही वैध कागदपत्र सादर करता आली नाहीत.


हेही वाचा – फक्त एका प्रवाशाला घेऊन उडले विमान!

घटना गंभीर का आहे?

खरंतर कोणत्याही विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलेली असते. विमानात कुणी हत्यारं किंवा शस्त्र नेऊन काही गैरकृत्य करू नये, यासाठी ही सुरक्षा असते. त्यामध्ये आधी सामानाचं चेकिंग आणि नंतर प्रत्यक्ष त्या व्यक्तीचं चेकिंग सुद्धा केलं जातं. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं. मात्र, एवढं सगळं करून देखील ही व्यक्ती सर्व सुरक्षा पार करून विमानात गेली. स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर या व्यक्तीला खाली उतरवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

First Published on: January 10, 2019 12:04 PM
Exit mobile version