घरदेश-विदेशफक्त एका प्रवाशाला घेऊन उडले विमान

फक्त एका प्रवाशाला घेऊन उडले विमान

Subscribe

फिलिपिन्स एअरलाइन्सचे पीआर २८२० विमान फक्त एका प्रवाशाला घेऊन उडले आहे. प्रवाशी विमानात खाजगी विमानाचा अनुभव आल्याने या महिलेला आनंद झाला. तिने याचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आले आहे.

विमानाने प्रवास करताना अनेकदा बुकिंग फुल असल्याने सीट उपलब्ध नसल्तात. अशात प्रवाशांना गैरसोय होते. प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे विमानांना अधिक फेऱ्याही माराव्या लागतात. प्रवाशांनी भरलेल्या विमानात ऐवजी एका खाजगी विमानाने प्रवास करण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते. मात्र खाजगी प्लेन करुन प्रवास करणे हे सर्वांच्या अवाक्यात असेल असे नाही. फक्त श्रीमंत व्यक्ती किंंवा मोठे राजकारणींच प्रवासासाठी खाजगी विमानाचा अवलंब करताना दिसतात. खाजगी प्रवास करण्यासाठी या दोघांपैकी एक तरी असणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिकांना असा प्रवास करणेच शक्य नसते. मात्र फिलीपीन्स मधिल एका प्रवाशी महिलेने चक्क एकटीने प्रवास केला आहे. प्रवासादरम्यान तिच्या सोबत फक्त विमानातील कर्मचारीच होते. मोठ्या विमानात एकट्या महिलेनी प्रवेश केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता. या महिलेने प्रवासादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहे. यानंतर अनेकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. फक्त एकाच प्रवाशाला घेऊन विमान कसे उडाले असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हे फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर अनेकांनी या महिला नशीबवान असल्याची पदवीही दिली आहे.

सोशल मीडियावर टाकले फोटो

लुईसा एरिस्पे असे या महिला प्रवाशाचे नाव आहे. ही महिला फिलिपिन्स एअरलाइन्सचे पीआर २८२० विमानाने प्रवास करत होती. ही महिला दवाओहून मनालीपर्यंत प्रवास करत होती. लुईसा हीने दवा विमानतळावर विमानात प्रवेश केला. यावेळी या विमानात आपण एकटीच प्रवाशी असल्याचे तिला समजले. सुरुवातीला लुईसालाही थोडे विचित्र वाटले. मात्र विमानात आपण एकटचे प्रवास करणारे असल्याने तिला आनंद झाला. या प्रवासादरम्यान तिला आलेला अनुभव हा जीवनात कधीही न विसरण्या सारखा असल्याचे तिने सांगितले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -