औरंगाबादमध्ये ४१ नवे रुग्ण, मुंबई पुण्याहून आलेल्यांमुळे वाढली कोरोना रूग्णांची संख्या!

औरंगाबादमध्ये ४१ नवे रुग्ण, मुंबई पुण्याहून आलेल्यांमुळे वाढली कोरोना रूग्णांची संख्या!

कोरोनाचा फैलाव राज्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ आता औरंगाबादमध्ये कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे. त्यामुळे औरंगाबादच्या रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यात आज करोनाचे नवे ४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आज आढळलेल्या ४१ रूग्णांमध्य १६ महिला आणि २५ पुरूषांचा समावेश आहे. त्यामुळे आता औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या आता १ हजार ११७ वर पोहचली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

या परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण

गणेश नगर, सातारा गाव खंडोबा मंदिर, न्यायनगर, पुंडलिक नगर, पोलीस कॉलनी, लिमयेवाडी, मित्र नगर, शरीफ कॉलनी, मुकुंदवाडी, रोहीदास नगर, उस्मानपुरा, कैलासनगर, जुना मोंढा, भवानी नगर, शिवशंकर कॉलनी, बालाजी नगर, इंदिरानगर, खडकेश्वर, माणिक नगर, जयभीम नगर, संजय नगर, सिटी चौक, जिल्हा सामान्य रुग्णालय, आझम कॉलनी या शहरांमधील भागांसह फुलंब्री तालुक्यातील बाबारा भिवसने वस्ती व कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, औराळा औरंगाबादच्या या भागांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

मुंबई, पुण्याहून आलेल्यांमुळे वाढते कोरोनाची संख्या

मुंबई, पुण्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना आता आपल्या गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. या लोकांमुळे आता गावागावात कोरोना पोहचला आहे. त्यामुळे मराठवाडय़ातील कोरोनाबाधितांची संख्या आता वाढू लागली आहे. आतापर्यंत मराठवाडय़ात कोरोनाने ४० जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमध्ये सापडलेले सर्व रूग्ण हे एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे बाधीत झाले आहेत.  औरंगाबाद शहरातील वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांची व मृत्यूची संख्या लक्षात घेता वयोवृद्धांची तपासणी केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.


हे ही वाचा – सेवानिवृत्त सासरा सुनेच्या डोक्यावर बंदूक ठेवून करायचा वारंवार बलात्कार!


 

First Published on: May 20, 2020 12:01 PM
Exit mobile version