कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक जिल्ह्यात लॉकडाऊन करा, हायकोर्टाचा ठाकरे सरकारला सल्ला

कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक जिल्ह्यात लॉकडाऊन करा, हायकोर्टाचा ठाकरे सरकारला सल्ला

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : सेवेदरम्यान अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला नोकरी

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार सुरुच आहे. कोरोना वाढता प्रादुर्भावा रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊन करावा असा सल्ला हायकोर्टाने ठाकरे सरकारला दिला आहे. पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आहे अशा ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण लॉकडाऊन घोषित करावा असा सल्ला हायकोर्टाने दिला आहे. राज्यातील इतर ठिकाणी कडक निर्बंध प्रभावी ठरत आहेत ते पुण्यातही ठरतील त्यामुळे पुण्यात काही दिवसांचा का होईना पण लॉकडाऊ करावा असे हायकोर्टाने सांगितले.

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर सध्या सुनावणी सुरु आहे. त्याचप्रमाणे मुंबई कोरोना रुग्णसंख्या ज्या प्रकारे कमी होत आहे याचे सर्वोच्च न्यायलयाने कौतुक केले. मुंबईत ज्या प्रकारे कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. इतर जिल्ह्यांच्या महानगरपालिका मुंबईचा आदर्श का घेत नाहीत. मुंबईत लावलेल्या कडक निर्बंधांमुळे जर मुंबईतील रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे,तर पु्ण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यातही मुंबईसारखे कडक निर्बंध लावून रुग्णसंख्या कमी करता येईल. त्यामुळे ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या सर्वाधिक आहे अशा ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण लॉकडाऊनचा गांभीर्यांने विचार करावा असा सल्ला हायकोर्टाने दिला आहे.

महाराष्ट्रात २४ तासात ५६ हजार ६४० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ७२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू आहे. पुण्यात कोरोना बाधित रुग्णांनी सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. पुण्यात सध्या ९५ हजारांहून अधिक अँक्टिव रुग्ण आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: चिंताजनक! राज्यात २४ तासांत ९२० जणांचा मृत्यू; ५७,६४० नव्या रुग्णांची नोंद

First Published on: May 6, 2021 1:23 PM
Exit mobile version