आता सर्व राज्यात लॉकडाऊन!

आता सर्व राज्यात लॉकडाऊन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

केंद्र सरकारने सर्व राज्यात लॉकडाऊन करण्यास निर्देश जारी केले आहेत. लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रकातून सूचित केले आहे. जनता कर्फ्यु यशस्वीपणे पाळल्यानंतर सोमवारी पुन्हा इतर राज्यातील अनेक लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले दिसून आले, पंतप्रधानांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. काही राज्यात आधीच लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे, पण केंद्र सरकारने या परिस्थितीमध्ये सर्वच राज्यांना लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.

करोनाशी लढा देण्याच्या उद्देशाने लॉकडाऊन जाहीर केलेला असतानाही काही लोक याला गांभीर्याने घेत नाहीत. कृपा करून तुम्ही स्वतःला वाचवा, आपल्या कुटुंबाला वाचवा आणि सूचनांचे पालन करा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे केले आहे. याशिवाय राज्यातील सरकारांनी लॉक डाऊनचे नियम आणि कायद्याचे लोकांना पाला करण्यास भाग पाडावे, असेही मोदींनी निर्देश दिले आहेत.

राजस्थान व पंजाबमध्ये ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन 

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राजस्थाननंतर आता पंजाब सरकारनेही मोठा निर्णय घेत संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी करोना विषाणूही लढा देण्यासाठी प्रशासनाला मदत करा, असे आवाहन जनतेला केले आहे. यापूर्वी पंजाब सरकारने राज्यातील काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. यात जालंधर, संगरूर अशा जिल्ह्याचा समावेश होता. मात्र, करोना विषाणूची लागण झालेल्याची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यात लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published on: March 23, 2020 1:11 PM
Exit mobile version