वाचा! राज्यात कधी, कुठे होणार मतदान?

वाचा! राज्यात कधी, कुठे होणार मतदान?

इव्हीएम मशिन

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पुढील, एप्रिल महिन्यात मतदान होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात चार टप्प्यात हे मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ७ जागांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यातील १० जागांसाठी १८ एप्रिलला मतदान होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील १४ जागांसाठीचे मतदान २३ एप्रिलला होणार असून चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील १७ जागांसाठीची मतदान प्रक्रिया २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. राज्यातील कोणत्या मतदारसंघात कोणत्या टप्प्यात मतदान होईल, याचीही यादी राज्य निवडणूक आयोगाने जारी केली असून यामध्ये विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई शहर असे विभाजन झाल्याचे दिसत आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान

दुसऱ्या टप्प्यातील मतदान

तिसऱ्या टप्प्यातील मतदान

चौथ्या टप्प्यातील मतदान


महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान

पहिला टप्पा – ११ एप्रिलला महाराष्ट्रात ७ जागांसाठी मतदान

दुसरा टप्पा –१८ एप्रिलला महाराष्ट्रात १० जागांसाठी मतदान

तिसरा टप्पा – २३ एप्रिलला महाराष्ट्रात १४ जागांसाठी मतदान

चौथा टप्पा – २९ एप्रिलला महाराष्ट्रात १७ जागांसाठी मतदान


या तारखा महत्त्वाच्या

अर्ज भरण्याची तारीख – १८ मार्चपासून

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २५ मार्च

अर्ज छाननी – २६ मार्च

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – २८ मार्च

मतदानाची तारीख – ११ एप्रिल

निकाल – २३ मे

First Published on: March 10, 2019 8:32 PM
Exit mobile version