Raj Thackeray : मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार! राज ठाकरेंची शिवतीर्थावरुन गर्जना

Raj Thackeray : मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार! राज ठाकरेंची शिवतीर्थावरुन गर्जना

राज ठाकरे यांचा शिवाजी पार्क येथे गुढीपाडवा मेळावा

मुंबई – राज ठाकरे यांची मनसे शिंदे गटाच्या शिवसेनेत विलीन होणार, या चर्चांना राज ठाकरेंनी पूर्ण विराम लावला आहे. अमित शहांसोबतची भेट झाली, पण इंजिन हे चिन्ह मनसेचे आहे. ते माझ्या मनसैनिकांच्या बळावर मिळवले आहे. ते असे जाऊ देणार नाही, सांगत कमळ चिन्हावर लढण्याच्या चर्चांनाही राज ठाकरे यांनी पूर्णविराम लावला आहे. राज ठाकरे म्हणाले की, काय तर म्हणे राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार… अरे मूर्खांनो व्हायचं असतं तर 2006 सालीच झालो नसतो का? तेव्हा खासदार-आमदार माझ्या घरी आले होते. पण मी पक्ष फोडून राजकारण करणाऱ्यातला नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार आहे, असे सांगत त्यांनी मनसे इतर पक्षात विलिन होणार या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका. मी जे अपत्य जन्माला घातलं आहे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ तेच मी वाढवणार. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत. असे राज ठाकरे म्हणाले.

LIVE UPDATE

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

जवळपास पाच वर्षानंतर महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत.
महापालिकेच्या निवडणुका आता होतील असे म्हणत, अजून झाल्या नाहीत.
२०१९ नंतर आता २०२४ मध्ये आता निवडणुका होत आहे.
निवडणुकीमध्ये डॉक्टर आणि नर्सेसची नेमणूक.
निवडणुका होणार आहे, हे निडणूक आयोगाला माहित आहे. तेव्हा त्यांनी त्यांची यंत्रणा उभी करायला नको का?
डॉक्टर आणि नर्सेसनी त्यांचे काम करावे, तुम्हाला कोण कामावरुन काढतो ते मी बघतो.

पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवशी काम करावं लागतं.

अमित शहांच्या भेटीनंतर जे की चक्र सुरु झाली.
चॅनल्सला नाव ठेवलं. आज मला असे वाटते!
हल्ली हे असतात, कॅमेरा घेऊन पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे.
राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार.
मला जर व्हायचे असते तर तेव्हाच नसतो झालो?
32 आमदार, सहा सात खासदार माझ्या घरी जमले आणि आपण एकत्र बाहेर पडू असं म्हणाले होते.
मी त्यांना तेव्हाच सांगितले होते की, मला पक्ष फोडून काहीही करायची इच्छा नाही. तेव्हाच सांगितले होते की मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरीही एकाला संधी दिली होती.

शिवसेनेचा अध्यक्ष होणार- चर्चा
मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहाणार!
1995 ला जागा वाटपाच्या चर्चेला बसलो होतो. ते माझं टेम्प्रामेंटच नाही.
मला ते होणार नाही, माझ्याकडून ते जमणार नाही.

दिल्लीला गेलेले हे ठाकरे पहिलेच. – चर्चा
1987 साली बाळासाहेब ठाकरे संजय गांधी, इंदिरा गांधींना भेटायला गेले होते.
लोक एकमेंकांना भेटायला जात असतात. त्यात कसला आला कमीपणा.

लाव रे तो व्हिडिओचे काय होणार – चर्चा
काँग्रेसवाल्यांसोबत भेटी होत्या, गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर.

हेही वाचा : Raj Thackeray at Shivaji park : नरेंद्र मोदींना पाठिंबा पण…; राज ठाकरेंनी जाहीर केला लोकसभेनंतरचा अजेंडा

First Published on: April 9, 2024 8:31 PM
Exit mobile version