Lok Sabha 2024 : महाराष्ट्रातील 48 जागांवर आतापर्यंत कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी? वाचा यादी

Lok Sabha 2024 : महाराष्ट्रातील 48 जागांवर आतापर्यंत कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी? वाचा यादी

लोकसभा निवडणूक 2024 साठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी वेगळीच असणार आहे. या लोकसभा निवडणुकासाठी भाजपसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. आतापर्यंत भाजपने महाराष्ट्रातील 24 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच, काँग्रेसने 12 जागांवर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 18 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच, आज (28 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. (Lok Sabha 2024 Which party has a chance for 48 seats in Maharashtra Read the full list in Marathi)

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार देशात सात टप्प्यात आणि महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदारप्रक्रिया पार पडणार आहेत. विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत होणार आहे. त्यापार्श्वभूमीलवर जागावाटपही झालेले आहे. तर पाहुयात आतापर्यंत कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली आहे?

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार

  1. नागपूर नितीन गडकरी (भाजप) विकास ठाकरे (काँग्रेस)
  2. चंद्रपूर मुनगंटीवार (भाजप) प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) राजेश वर्लुजी बेल्ले (वंचित)
  3. भंडारा-गोंदिया सुनील मेंढे (भाजप) प्रशांत पडोळे (काँग्रेस) संजय केवट (वंचित)
  4. गडचिरोली-चिमूर अशोक नेते (भाजप) डॉ.नामदेव किरसान (काँग्रेस) हितूश पांडुरंग मढवी (वंचित)
  5. रामटेक राजू पारवे (शिवसेना) रश्मी बर्वे (काँग्रेस)
  6. मावळ श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट) संजोग वाघेरे – पाटील (शिवसेना ठाकरे गट)
  7. हातकणंगले – धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट)
  8. कोल्हापूर – संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट) शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस)
  9. हिंगोली – हेमंत पाटील (शिवसेना शिंदे गट) नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट)
  10. बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट) प्रा. नरेंद्र खेडेकर (शिवसेना ठाकरे गट)
  11. शिर्डी – सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट) भाऊसाहेब वाघचौरे (शिवसेना ठाकरे गट)
  12. दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)
  13. यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट)
  14. सांगली – संजयकाका पाटील (भाजप) चंद्रहार पाटील (शिवसेना ठाकरे गट)
  15. संभाजीनगर – चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट)
  16. धारशीव – ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)
  17. नाशिक – राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट)
  18. रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) अनंत गीते (शिवसेना ठाकरे गट)
  19. सिंधुदुर्ग-रत्नागिरी विनायक राऊत (शिवसेना ठाकरे गट)
  20. ठाणे – राजन विचारे (शिवसेना ठाकरे गट)
  21. मुंबई-ईशान्य – मिहीर कोटेचा (भाजप) संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट)
  22. मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)
  23. मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर (शिवसेना ठाकरे गट)
  24. मुंबई-उत्तर पियुष गोयल (भाजप)
  25. परभणी – संजय जाधव (शिवसेना ठाकरे गट)
  26. पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप) रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
  27. नंदुरबार – डॉ. हिना गावित (भाजप) गोवाल पाडवी (काँग्रेस)
  28. अमरावती – नवनीत राणा (भाजप) बळवंत वानखेडे (काँग्रेस)
  29. नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
  30. धुळे – सुभाष भामरे (भाजप)
  31. जळगाव – स्मिता वाघ (भाजप)
  32. रावेर – रक्षा खडसे (भाजप)
  33. अकोला – अनुप धोत्रे (भाजप)
  34. वर्धा – रामदास तडस (भाजप)
  35. जालना – रावसाहेब दानवे (भाजप)
  36. दिंडोरी – डॉ. भारती पवार (भाजप)
  37. भिवंडी – कपिल पाटील (भाजप)
  38. शिरुर – शिवाजीराव आढळराव पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)
  39. अहमदनगर – सुजय विखे पाटील (भाजप)
  40. बीड – पंकजा मुंडे (भाजप)
  41. लातूर – सुधाकर श्रृंगारे (भाजप) शिवाजीराव काळगे (काँग्रेस)
  42. सोलापूर – राम सातपुते (भाजप) प्रणिती शिंदे (काँग्रेस)
  43. माढा – रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
  44. सातारा –
  45. पालघर –
  46. कल्याण –
  47. बारामती –
  48. मुंबई उत्तर मध्य –

हेही वाचा – Savitri Jindal : लोकसभेपूर्वी काँग्रेसला धक्का! पक्षाला सोडचिठ्ठी देत सावित्री जिंदाल यांचा भाजपमध्ये प्रवेश

First Published on: March 28, 2024 8:59 PM
Exit mobile version