घरताज्या घडामोडीSavitri Jindal : लोकसभेपूर्वी काँग्रेसला धक्का! पक्षाला सोडचिठ्ठी देत सावित्री जिंदाल यांचा...

Savitri Jindal : लोकसभेपूर्वी काँग्रेसला धक्का! पक्षाला सोडचिठ्ठी देत सावित्री जिंदाल यांचा भाजपमध्ये प्रवेश

Subscribe

नवीन जिंदाल यांची आई आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला असलेल्या सावित्री जिंदाल यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा त्यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली.

लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी अनेक पक्षातील नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश घेत आहे. नुकताच महाराष्ट्रातील मुंबईत अभिनेता गोविंदा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यापूर्वी काँग्रेस नेता नवीन जिंदाल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच, भाजपने हरियाणातील कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून नवीन जिंदाल यांना उमेदवारी ही जाहीर केली. अशातच आता नवीन जिंदाल यांची आई आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला असलेल्या सावित्री जिंदाल यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा त्यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. (Savitri jindal Former Minister Of Haryana Resigns Congress And Join BJP Lok Sabha 2024)

हरियाणाच्या माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या सावित्री जिंदाल (84) या हिसार येथील भाजपच्या एका कार्यक्रमात सामील झाल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सावित्री जिंदाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री जिंदाल यांचे नाव आघाडीवर आहे. जिंदाल ग्रुपचा मोठा व्यवसाय त्या सांभाळतात. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 28 मार्च 2024 पर्यंत, सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती 29.6 अब्ज डॉलर इतकी आहे. भारतीय चलनात हे सुमारे 2.47 लाख कोटी रुपये इतके आहे. जागतिक स्तरावर, सावित्री जिंदाल जगातील अब्जाधीशांच्या यादीत 56 व्या स्थानावर आहेत.

ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल हिसार मतदारसंघातून आमदार आणि 10 वर्षांपासून हरियाणा सरकारमध्ये मंत्री आहेत. जिंदाल यांचे पती आणि जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओपी जिंदाल यांचे 2005 मध्ये विमान अपघातात निधन झाल्यानंतर हिसार मतदारसंघातून हरियाणा विधानसभेवर निवडून आले. त्यांनी 2009 मध्ये हिसारमधून पुन्हा निवडणूक लढवली आणि जिंकली.

- Advertisement -

ऑक्टोबर 2013 मध्ये त्यांना हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. 2006 मध्ये त्यांनी शहरी स्थानिक संस्था आणि गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. मात्र, 2014 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत सावित्री जिंदाल यांना हिसारमधून पराभवाला सामोरे जावे लागले.


हेही वाचा – CBI : निवडणुकीच्या मोसमात अजित पवार गटासाठी आनंदाची बातमी; या बड्या नेत्याला भ्रष्टाचार प्रकरणी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -