घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : मतदानानंतर प्रकाश आंबेडकरांची इथेनॉलवरून विरोधकांवर टीका; म्हणाले, हा...

Lok Sabha 2024 : मतदानानंतर प्रकाश आंबेडकरांची इथेनॉलवरून विरोधकांवर टीका; म्हणाले, हा VBA चा विजय

Subscribe

लोकसभेच्या आकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. नुकताच प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. पत्नीसह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मतदानानंतर प्रकाश आंबेडकर यांनी उस आणि इथेनॉलच्या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधला.

आकोला : लोकसभेच्या आकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. नुकताच प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. पत्नीसह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मतदानानंतर प्रकाश आंबेडकर यांनी उस आणि इथेनॉलच्या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधला. सोलापूर, पुणे, नगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या मतदारसंघांत सरकारी पक्षाच्या उमेदवारांना फायदा व्हावा, यासाठी पॉलिस मेकर निर्णय जाहीर करण्यात आले. पण हे पॉलिस मेकर निर्णय जाहीर करण्याचा अधिकार नसतानाही ते जाहीर करण्यात आले, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (lok sabha election 2024 VBA Leader Prakash Ambedkar Slams Opposition Party On Suger second phase voting updates in marathi)

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात परभणी, नांदेड आणि हिंगोली हे तीन मतदारसंघ ऊसाचे सेक्टर असल्याची परिस्थिती आहे. इथोनॉलवरील बंदी उठली आणि त्याच्या फॅक्टऱ्या निघाल्या तर, ऊसाचा दर 500 रुपयांनी वाढेल, अशी परिस्थिती असल्याचे आम्ही पक्षाच्या वतीने इचलकरंजीच्या सभेत म्हटलं होतं. सरकारी पक्षांनी या तिन्ही मतदारसंघात फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे सोलापूर, पुणे, नगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या मतदारसंघांत सरकारी पक्षाच्या उमेदवारांना फायदा व्हावा, यासाठी पॉलिस मेकर निर्णय जाहीर करण्यात आले. पण हे पॉलिस मेकर निर्णय जाहीर करण्याचा अधिकार नसतानाही ते जाहीर करण्यात आले. तसेच, इथेनॉल घालण्यात आलेली बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग याकडे गांभीर्याने लक्ष देणार आहे की नाही, हे महत्त्वाचे आहे. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा वंचित बहुजन आघाडीचा विजय असल्याचे मानतो. त्या भागांत आता अंमलबजावणी करण्यात आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळेल, असे चित्र दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ईव्हीएम बंद होणे हे तर षडयंत्र, संजय राऊतांचा आरोप

निवडणुकीच्या काळात इथेनॉलवरील बंदी उठवली असून त्याची अंमलबजावणी करण्याचा भाग अद्याप बाकी आहे. त्यामुळे मतदारांसाठी अंमलबजावणी करीता आम्ही प्रश्न ऐरणीवर आणला. त्याचे बदल आता पाहायला मिळत आहेत. त्या बदल्यानंतर आता लोकांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान केल्यास त्यांची अंमलबजावणी करणे सोपं होईल. जो प्रश्न कुठल्याच पक्षांनी घेतला नाही. मग तो काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भ भाग सोडला तर, उस हे महत्त्वाचे पीक आहे. त्या संदर्भातील महत्त्वाचा असलेला इथेनॉलचा प्रश्नाला बगल दिली जात होती. त्याचा उल्लेख केला जात नव्हता. पण त्याला आम्ही केंद्रस्थानी आणले असून त्याचा आम्हाला फायदा होईल असे वाटते.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा देशाच्या राज्यगादीवर बसवण्यासाठी विक्रमी मतदान करा – संतोष बांगर

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -