Lok Sabha 2024 : …याची किंमत मोजावी लागेल, मिटकरींचा राणांना इशारा

Lok Sabha 2024 : …याची किंमत मोजावी लागेल, मिटकरींचा राणांना इशारा

...याची किंमत मोजावी लागेल, अमोल मिटकरींचा राणांना इशारा

अमरावती : महायुतीकडून भाजपातर्फे अमरावती लोकसभेच्या उमेदवार असलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अमरावतीत येणार आहे. ज्यामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापले आहे. बच्चू कडूंच्या उमेदवाराला सभेसाठी मिळालेले मैदान अचानक अमित शहा यांच्या सभेसाठी देण्यात आल्याने अमरावतीत राजकीय वाद सुरू झाला आहे. पण आता दुसरीकडे मात्र, महायुतीतच अमरावतीत होणाऱ्या सभेवरून नव्या वादाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Lok Sabha Election 2024 Amol Mitkari warns Navneet Rana for not putting Ajit Pawar photo on banner in Amravati)

महायुतीच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार, खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी येणाऱ्या केंद्रीय अमित शहांसाठी जय्यत तयारी करण्याक आली. या प्रचारसभेसाठी मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उमेदवार नवनीत राणा यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे. पण यामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो वगळण्यात आला आहे. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : माझ्या पराभवासाठी विरोधकांचा अमरावतीत ठिय्या, राणांचा खोचक टोला

अमरावतीतील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब असल्याने आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, महायुतीत समन्वय ठेवण्याचा प्रयत्न वरीष्ठ पातळींवर झालेला असताना अमरावतीत आज उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो टाळणे, ही नवनीत राणा यांची मोठी चूक आहे. महायुतीचा धर्म नवनीत राणा यांनी पाळला पाहिजे. महायुतीत मिठाचा खडा ऐन निवडणुकीच्या वेळी का टाकत आहात? याचे उत्तर द्या, असे मिटकरी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तसेच, जर दोन दिवसांत म्हणजेच महाराष्ट्रात शुक्रवारी (ता. 26 एप्रिल) होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यानंतर तुम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागेल. पण त्याआधी त्यांनी ही चूक दुरुस्त करावी, असा इशारा आमदार मिटकरी यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र, अद्याप तरी खासदार नवनीत राणा यांच्याकडून याबाबत कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. परंतु, मिटकरी यांचा हा व्हिडीओशरद पवार गटाचे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप रिपोस्ट केला आहे. “असं नाही.. नीट रडायचं ! मोठमोठ्याने टाचा रगडून रडायचं, तरच बोनस मिळेल,” असा टोला प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.

हेही वाचा…Lok Sabha 2024 : मोदी हे खोटं बोलणारे नेते, 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत; संजय राऊतांची टीका 


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 24, 2024 3:59 PM
Exit mobile version