घरमहाराष्ट्रमराठवाडाLok Sabha 2024 : माझ्या पराभवासाठी विरोधकांचा अमरावतीत ठिय्या, राणांचा खोचक टोला

Lok Sabha 2024 : माझ्या पराभवासाठी विरोधकांचा अमरावतीत ठिय्या, राणांचा खोचक टोला

Subscribe

प्रचाराच्या मुद्द्यावरून खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये नव्या वादाला सुरुवात झाली आहे. पण आता महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

अमरावती : महायुतीच्या भाजपाकडून अमरावती लोकसभा लढवणाऱ्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अमरावतीत येणार आहे. ज्यामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापले आहे. पण अमित शहा यांची ज्या मैदानात सभा होणार आहे, ते मैदान बच्चू कडू यांना त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी न मिळाल्याने मोठा राजकीय गोंधळ झाला आहे. या मुद्द्यावरून आता पुन्हा राणा आणि कडू यांच्यामध्ये जुंपली असून नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टोलेबाजी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची देखील आज बुधवारी (ता. 24 एप्रिल) सभा होणार असल्याने नवनीत राणा यांनी याबाबतही आपले मत व्यक्त केले आहे. (Lok Sabha Election 2024 Navneet Rana criticizes opponents)

प्रसार माध्यमांनी खासदार नवनीत राणा यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, मी पाच वर्ष ज्या पद्धतीने काम केले, लोकांच्या सेवेत 24 तास दिले, त्यामुळे आता देशभरातील विरोधकांना माझा पराभव करण्यासाठी अमरावतीत यावे लागत आहे. त्यामुळे या गोष्टीचा मला अभिमान आहे. दिल्लीचे नेते असो किंवा महाराष्ट्रातील मोठे नेते असो ते अमरावतीत येत आहे, ज्यामुळे या निमित्ताने त्यांना माझी अमरावती कशी आहे? हे पाहायला मिळेल.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : गृहमंत्री अमित शहांनीच कायदा तोडला, त्यांनी…; बच्चू कडूंचा हल्लाबोल

यावेळी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्याबाबत खासदार नवनीत राणा यांना प्रश्न केला असता, त्यांनी कडू यांना टोला लगावत म्हटले की, बच्चू कडू माझ्यापेक्षा खूप मोछे आहेत. त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त असल्याने ते मला वरिष्ठ आहेत. त्यांनी जे केले आहे, ते नेहमीत ते दुसऱ्यांच्या नावाने जाहीर करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल फारसे बोलणार नाही. माझे लक्ष्य हे माझ्या मतदारसंघावर आहे, माझ्या लोकांवर आहे, असा टोला त्यांनी बच्चू कडू यांना लगावला आहे.

- Advertisement -

देशात पंतप्रधान मोदींची हवा…

देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा असल्याने मला मोठे आव्हान वाटत नाही. पण लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे. मी गेली पाच वर्षे अमरावतीकरांच्या पाठिशी उभी राहिल्याने ते सर्व आज माझ्या पाठिशी उभे आहेत. त्यामुळे जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यामुळे मला फारसा विचार करण्याची काही गरज नाही. मोदींची हवा काल होती, आहे आणि उद्या राहणार. ज्याप्रमाणे देशात मोदींच्या विरोधात विरोधक एकत्र आले, त्याप्रमाणे आज मला पराभूत करण्यासाठी विरोधक एकत्र आले आहे, अशी टीका नवनीत राणा यांनी विरोधकांवर केली.

अमरावतीकरांना मतदानाचे आवाहन…

पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात निवडणूक पार पडली. पण त्या ठिकाणी मतदारांचा निरुत्साह पाहायला मिळाला. ज्यामुळे आता खासदार, महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी मतदारांना आवाहन करत म्हटले की, 26 तारखेला लग्नाचा मुहूर्त आहे, पण तरी देखील मतदान कमी नाही झाले पाहिजे. कारण देशासाठी हे अत्यंत महत्त्वाचे मतदान आहे. लोकांच्या एका मताने देखील खूप मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे माझ्या एका मताने काय होईल, याचा विचार करू नका, असे नवनीत राणा यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : भाजपा नेते धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा, म्हणाले…


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -