Lok Sabha : उमेदवारी मागे घेतल्यानंतर पाठिंबा; आनंदराज आंबेडकरांची वंचितच्या पत्रावर आगपाखड

Lok Sabha : उमेदवारी मागे घेतल्यानंतर पाठिंबा; आनंदराज आंबेडकरांची वंचितच्या पत्रावर आगपाखड

आनंदराज आंबेडकरांकडून उमेदवारी मागे; वंचितला पाठिंबा देणार

अमरावती : रिपल्बिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. तीन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला पत्र लिहूनही त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा न दिल्याने आणि संविधानप्रेमी जनतेच्या मतांमध्ये होणारी विभागणी टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी काल जाहीर केलं होतं. त्यानंतर वंचितने आनंदराज आंबेडकर यांना पत्र लिहत आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं सांगितलं. मात्र उमेदवारी मागे घेतल्यानंतर वंचितने पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केल्यामुळे आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रावर आगपाखड करत गंभीर आरोप केले आहेत. (Lok Sabha election 2024 Amravati Lok Sabha Constituency Anandraj Ambedkars letter on Vanchit Agpakhar Prakash Ambedkar Amravati Lok Sabha Constituency)

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : आता बदल करायचाच ही लोकांची मानसिकता – संजय राऊत

आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले की, “वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे आपले दि. 4/4/2024 रोजीचे माझ्या अमरावती मतदारसंघातील उमेदवारीला पाठिंबा असल्याचे पत्र मला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाले. सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो. परंतु आपल्या सदर पत्रात आपण माझ्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडी समर्थन करेल व वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार नामांकन दाखल करणार नाही, असे आपल्या पक्षाने व अधिकृत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आम्हाला कळवले आहे. हा तुमचा प्रयत्न अतिशय धादांत खोटा, चुकीचा आणि संविधान प्रेमी जनतेची दिशाभूल करणारा आहे, असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.

आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले की, मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की माझ्या नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आपल्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमधील स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझ्या नामांकन रॅलीमध्ये कोणीही सहभागी होऊ नका अशा फोनद्वारे सूचना वजा ताकीद देण्यात आली होती अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली असल्याचंही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : सात खासदारांची तिकीट कापली, हा तर नियतीचा खेळ; वरुण सरदेसाईंची शिदेंवर टीका

First Published on: April 5, 2024 8:43 AM
Exit mobile version