घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : आता बदल करायचाच ही लोकांची मानसिकता - संजय राऊत

Lok Sabha Election 2024 : आता बदल करायचाच ही लोकांची मानसिकता – संजय राऊत

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होऊन सांगलीचा उमेदवार बदला अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगली आमचीच असे स्पष्ट केले होते. यानंतर आज (5 एप्रिल) ते सांगली दौऱ्यावर जात आहेत. याचपार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं की, आता बदल करायचाच ही लोकांची मानसिकता आहे. (Lok Sabha Election 2024 Sangli Lok Sabha Constituency Now change the mentality of the people Sanjay Raut)

हेही वाचा – Lok Sabha 2024 : सात खासदारांची तिकीट कापली, हा तर नियतीचा खेळ; वरुण सरदेसाईंची शिदेंवर टीका

- Advertisement -

निवडणुकीचा पहिला टप्पा विदर्भात सुरू झाला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. त्यामुळे आपण वेळ न दंडवता मतदारांमध्ये जायला हवं. महाविकास आघाडीचं वातावरण या राज्यामध्ये अक्षरश: झंझावात असावा त्यापद्धतीचं मला दिसतं आहे. तसेच आता बदल करायचाच अशा मानसिकतेमध्ये लोकं आहेत. महाराष्ट्रात कोणीही कितीही डरकाळ्या फोडल्या तरी महाविकास धक्का बसणार नाही, असा विश्वास व्यक्त करत संजय राऊत म्हणाले की, विदर्भ दौऱ्यावर आदित्य ठाकरे जाणार आहेत. याशिवाय पुढील दिवस मी त्या भागात आहे. त्यानंतर मी हातकणंगलेला जाईल. तिथे शिवसैनिक, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील त्यांच्याशी बैठका घेऊन, त्यांना कामाला लावून, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहे. यासाठी मी त्या भागात जात आहे.

विश्वजित कदम, विशाल पाटील हे सध्या मुंबईत आहेत, पण ते जर सांगलीत असते तर त्यांची भेट घेतली असती का? त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांची जी नाराजी आहे ती समजून घेणार आहे? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे. प्रत्येक ठिकाणी मतदारसंघात जेव्हा आघाडी असते, तेव्हा तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा मनोमन असते.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : तिकीट कापलेल्यांचे काय होणार? मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान

रामटेक हा परंपरेने आमचा मतदारसंघ आहे. आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की, तो मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा. त्यासाठी त्यांचा हट्ट होता. पण आम्ही त्यांची समजूत काढली. तो मतदारसंघ आता काँग्रेसकडे आहे. छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला सोडला. तिथेही आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता की, तिथे मशाल चिन्हावरच निवडणूक लढली जावी. आम्ही तिथेही कार्यकर्त्यांची समजूत काढली. आपण जेव्हा आघाडीत काम करतो, तेव्हा कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन त्यांची समजूत काढायची असते. मला खात्री आहे की, काँग्रेसचं नेतृत्व सांगलीतलं आणि राज्यातलं हे जर कोणी नारज असतील त्या भागात तर त्यांची समजूत काढणं हे त्याचं कर्तृत्व आहे.

महाराष्ट्रात 35 पेक्षा जास्त जिंकण्याचं जे मिशन

काँग्रेस शिवसेनेच्या पर्यायासंदर्भात पॉझिटीव्ह आहे का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, अनेक मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही चर्चेला बसतो तेव्हा एखाद्या मतदारसंघ काँग्रेसकडे, राष्ट्रवादीकडे आणि आमच्याकडे येतो, तेव्हा आम्ही दुसरा पर्याय सुचवतो. सांगलीच्या बाबतीत आम्ही काँग्रेससोबत काही पर्यायासंदर्भता चर्चा केली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार या सगळ्यांनी त्यासंदर्भात एक सकारात्मक भूमिका घेतली आहे. पण लोकसभा निवडणूक सांगलीत शिवसेनेचा लढवणार, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच काँग्रसने पॉझिटीव्ह असायला पाहिजे, प्रधानमंत्री कोणाला पाहिजे? आमची प्रत्येक जागा ही पर्यायाने काँग्रेसच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी उभी राहील. त्यामुळे महाराष्ट्रात किमान 35 पेक्षा जास्त जिंकण्याचं जे मिशन आहे, त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -