Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला; आता छुप्प्या प्रचारावर उमेदवारांचा भर

Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला; आता छुप्प्या प्रचारावर उमेदवारांचा भर

मुंबई : आरोप-प्रत्यारोप, टीकेचे जोरदार प्रहार, नेत्यांच्या सभा, पदयात्रा यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शिगेला पोहचलेला प्रचार आज थंडावला आहे. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी 13 राज्यांमधील 89 जागांवर मतदान होणार आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष प्रचार संपल्यानंतर उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा भर छुप्या प्रचारावर असणार आहे. (Lok Sabha Election 2024 Campaigning for the second phase is over)

गेल्या शुक्रवारी सात टप्प्यातील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 जागांवर सुमारे 65.5 टक्के मतदान पार पडले. यानंतर आजा 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20 उमेदवार, कर्नाटकातील 28 पैकी 14, राजस्थानमधून 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून प्रत्येकी 8, मध्य प्रदेशमधून 7, आसाम आणि बिहारमधून प्रत्येकी 5, छत्तीसगडमधून 3 उमेदवार रिंगणात आहेत. तर पश्चिम बंगाल 3, मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू व काश्मीरमध्ये प्रत्येकी 1 जागेवर मतदान होणार आहे.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या आठ जागांसाठी 204 उमेदवार रिंगणात आहेत. पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे. या जागांसाठी एकूण 1,49,25,912 मतदार मतदानासाठी पात्र आहेत.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मतदानाचा टक्का वाढावा म्हणून… काही ठिकाणी न्याहारी तर, काही ठिकाणी बक्षीस

नांदेड मतदारसंघात महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण आणि भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात थेट लढत आहे. हिंगोलीत महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर आणि मिंधे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर यांच्यात लढाई होत असून परभणीत महाविकास आघाडीचे संजय जाधव आणि रासपाचे महादेव जानकर यांच्यात थेट सामना आहे. तर बुलढाण्यात महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडेकर, शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि अपक्ष रविकांत तुपकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

तिसऱ्या टप्प्यात 94 जागांवर मतदान (Voting in 94 seats in the third phase)

दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या 48 तास आधी प्रचार संपला असून आता या मतदारसंघामध्ये कोणीही बाहेरील व्यक्ती राहू नये याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार, सार्वजनिक सभा, राजकीय पक्षांच्या पत्रकार परिषदा, मुलाखती आणि इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियामध्ये पॅनल डिस्कशन यावरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 94 जागांवर मतदान होणार आहे.

हेही वाचा – Voting Boycott: 100 टक्के टोलमाफी द्या, अन्यथा मतदान करणार नाही; नागरिकांचा सरकारला इशारा

Edited By – Rohit Patil

First Published on: April 24, 2024 10:11 PM
Exit mobile version