Lok Sabha Election 2024 : बँक खाते व्यवहारावर निवडणूक आयोगाची करडी नजर

Lok Sabha Election 2024 : बँक खाते व्यवहारावर निवडणूक आयोगाची करडी नजर

ठाणे :

लोकसभा निवडणूक आयोगाने निवडणुकीत होणारा पैशाचा व्यवहार यावर करडी नजर ठेवली असून उमेदवार निवडणूक विभागाला रक्कम एक दाखवतात आणि पैशाचा गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे बँकेच्या सर्व खात्यावर निवडणूक विभागाची करडी असून बँकेने देखील सहकार्य करावे असे निवडणूक विभागाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी कळवले आहे.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूकीच्या पूर्व तयारीचे कामकाज हे  कालावधीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आहे. लोकसभा निवडणूक २०२४ या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून रोख रक्कम रेमिटन्स द्वारे आणावयाची असेल किंवा पाठवायची असेल तसेच रोखीचे मोठे व्यवहार होत असतील तर त्याकरिता संबंधित बँकेच्या प्रत्येक शाखेच्या शाखा प्रबंधकाना एक क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्येक बँकेने त्यांच्या मुख्य शाखेतून एक नोडल ऑफिसरची नेमणूक करणे आवश्यक असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्यानुषंगाने बँक खाते व्यवहारांवर निवडणूक विभागाची राहणार करडी नजर राहणार आहे. यामुळे उमेदवारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

 

हेही वाचा –Sanjay Raut : हिंदुत्वाचे तुम्ही काय दिवे लावले? राऊतांचा फडणवीसांना खोचक सवाल

मुख्य बँकेतील नोडल ऑफिसरचे युजर आयडी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करून दिले जाईल आणि त्या नोडल ऑफिसरने त्यांच्या बँकेच्या सर्व शाखा प्रबंधकाचे यूजर आयडी तयार करणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक शाखेची कॅश मुव्हमेंट होत असताना त्या शाखेकडून क्यू आर कोड जनरेट होणे अत्यावश्यक आहे. क्यू आर कोड नसताना जर कॅश रेमिटन्स केली आणि ती कॅश निवडणूक अधिकाऱ्याकडून पकडण्यात आली, तर त्याच्यावर आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घेण्याविषयी निवडणूक विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे जिल्हयातील सर्व बँकाकडून होणाऱ्या व्यवहारांची माहिती आयोगाकडे सादर करण्याबाबतची कार्यवाही करण्याकरिता जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नागेंद्र मंचाळ यांची जिल्हास्तरीय बँक समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सर्व बँकांनी त्यांच्याकडील समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करून तसे जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ कळवावे, असे जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी कळवले आहे.

हेही वाचा –Lok Sabha 2024 : दुसऱ्या टप्प्यात हे दिग्गज भिडणार

——————————————————————————————-

Edited by- Amol kadam

First Published on: April 22, 2024 12:53 PM
Exit mobile version