Lok Sabha Election Dates : जाणून घ्या, महाराष्ट्रात कोणत्या तारखेला कुठे होणार मतदान?

Lok Sabha Election Dates : जाणून घ्या, महाराष्ट्रात कोणत्या तारखेला कुठे होणार मतदान?

नवी दिल्ली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. देशात सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी (ता. 16 मार्च) पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. पण निवडणूक आयुक्तांकडून तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर अनेकांचा गोंधळ उडाला आहे. (Lok Sabha Election Dates : On which date and where will polling be held in Maharashtra?)

हेही वाचा… Election Commission : मतदारांना आमीष देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, निवडणूक आयोगाचा इशारा

महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मतदारसंघ महाराष्ट्रात आहेत. तर त्याहून अधिक लोकसभा मतदारसंघ म्हणजेच 80 लोकसभा उत्तर प्रदेशात आहेत. ज्यामुळे त्या राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. मुंबईत महाराष्ट्रातील पाच टप्प्यांपैकी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 20 मे ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ असून एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या पाच टप्प्यांमध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 07 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदार होणार असून 19 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यांत 5 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यांत 8 जागांसाठी, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रत्येकी 11 जागांसाठी आणि पाचव्या टप्प्यांत 13 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

महाराष्ट्रात असे होईल मतदान…

पहिला टप्पा (19 एप्रिल 2024) :
नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर

दुसरा टप्पा (26 एप्रिल 2024) :
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी

तिसरा टप्पा (07 मे 2024) :
रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा (13 मे 2024) :
नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा (20 मे 2024)
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण

First Published on: March 16, 2024 6:23 PM
Exit mobile version