घरदेश-विदेशElection Commission : मतदारांना आमीष देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, निवडणूक आयोगाचा इशारा

Election Commission : मतदारांना आमीष देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, निवडणूक आयोगाचा इशारा

Subscribe

नवी दिल्ली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात एकूण 7 टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने काही इशारेही दिले आहेत. निवडणुकीत आम्ही हिंसेला थारा देणार नाही. हिंसा खपवून घेतली जाणार नाही. हिंसामुक्त निवडणुका घेण्यावर आमचा भर असणार आहे. तर मतदारांना आमिष दाखवणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Election Commission: Strict action will be taken against those who bait voters, Election Commission warns)

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : देशात 7, तर महाराष्ट्रात 5 टप्प्यांत मतदान; लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

- Advertisement -

पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आमच्या समोर निवडणुकीत मनी आणि मसल पॉवर रोखण्याचे आव्हान आहे. पण आम्ही हे आव्हान पार पाडणार आहोत. मसल आणि मनी पॉवरचा निवडणुकीत वापर करणाऱ्यांवर आम्ही कठोर करावाई करू. निवडणुकीतील पैशाचा गैरवापर रोखण्यावर आमचा भर असणार आहे. निवडणुकीत कोणत्याही गैरव्यवहाराला थारा राहणार नाही, अशी माहिती देतानाच खोट्या बातम्यांमागची सत्यताही तपासणार आहोत. त्यासाठी वेबसाईट तयार करणार आहोत, असे निवडणूक आयुक्तांकडून सांगण्यात आले.

निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांकडून देण्यात आला आहे. उमेदवारांनी त्यांचा प्रचार जरूर करावा. पण कोणावरही वैयक्तिक टीका करू नये. राजकीय पक्षांनीही द्वेष निर्माण करणारे भाषण करू नयेत. तशा पद्धतीची विधाने करू नयेत. निवडणूक नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयक्तांकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

तर, निवडणूक आयोगाने अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. फेक न्यूज देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले असून आयोग सत्य आणि असत्य याची माहिती देणार आहे. त्याशिवाय निवडणुकीत विमाने आणि हेलिकॉप्टरमधून आलेल्या वस्तुंची तपासणी केली जाणार आहे, तर महत्त्वाची माहिती म्हणजे या निवडणुकीत मतदारांना भुलवण्यासाठी पैसा, दारू आणि साड्यांचे वाटप केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -