Lok Sabha 2019: सर्वांत लहान मुलीने बजावला मतदानाचा अधिकार

Lok Sabha 2019: सर्वांत लहान मुलीने बजावला मतदानाचा अधिकार

लोकसभा निवडणूक २०१९ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान देशातील विविध भागात आज (११ एप्रिल) मतदान होत आहे. देशातील १८ राज्यातील आणि २ केंद्रशासित प्रदेशातील राज्यात एकूण ९१ लोकसभेच्या जागांकरिता मतदान केले जात आहे. विदर्भातील सात जागांवर होत असलेल्या मतदानासाठी नागरिकांना सकाळपासून रांगा लावल्या आहेत. राज्यघटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोक उत्सुक असून याचा फोटो सोशल मीडियावर टाकून इतरांना देखील मतदान करण्यास आवाहन केले.

अवघी २ फूट ०२ इंच उंची

नागपूरमध्ये जगातील सर्वात कमी उंची असलेल्या मुलीने आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्योती आमगे असे या मुलीचे नाव असून, ज्योतीची उंची अवघी २ फूट ०२ इंच इतकी आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भात होत असलेल्या निवडणुकीत २५ वर्षाच्या ज्योतीने आपला मतदानाचा हक्क मतदान केंद्रावर आपल्या आई आणि वडिलांसोबत उपस्थित राहून बजावला.

गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी ज्योती

जगातील सर्वात कमी उंची असून कधी त्याचा न्यूनगंड न बाळगता ज्योती नेहमी एका सेलिब्रिटीसारखी मीडियाला सामोरी जाताना दिसते. ज्योती आमगे ही बॉडी शॉक: टू फूट टॉल टीन या डॉक्युमेंटरीमधून पहिल्यांदा समोर आली होती. त्यानंतर अमेरिकन हॉरर शो – फ्रिक शोमध्येही ती दिसली होती. २००९ मध्ये १८व्या वाढदिवसादिवशी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने तिला जगातील सर्वांत छोटी महिला म्हणून, घोषित केले.

First Published on: April 11, 2019 6:26 PM
Exit mobile version