भाजपाचे पुन्हा पंकजा मुंडेंकडे दुर्लक्ष? जे. पी. नड्डांच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही!

भाजपाचे पुन्हा पंकजा मुंडेंकडे दुर्लक्ष? जे. पी. नड्डांच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही!

संग्रहीत छायाचित्र

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा महाराष्ट्रात येणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे.पी. नड्डा यांचा चंद्रपूर आणि औरंगाबाद दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र असे असतानाही पुन्हा एकदा भाजपाने पंकजा मुंडे यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळते. कारण जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमपासून भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. (Lok Sabha Polls Pankaja Munde Not Inviting In Bjp President Jp Nadda Mission 2024)

जे.पी. नड्डा हे सोमवारी औरंगाबादमध्ये येणार आहेत. पंकजा मुंडे या मराठवाड्यातील प्रमुख भाजप नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांची उपस्थिती असणे अपेक्षित होते. परंतु, पंकजा मुंडे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळालेले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर माधव बन ओबीसी भटके विमुक्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. खुशाल मुंडे यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली आहे.

“पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाने लक्षात घ्यायला पाहिजे की, या महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच देशात बहुजन जनतेची एकजूट भाजपाच्या पाठीशी उभं करण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिलेली आहे. मुंडे साहेबांप्रमाणे पंकजा मुंडे या ही भाजपात काम करत आहेत. परंतु, भाजपाचे काही नेते त्यांना बाजूला करत आहेत. २०२४ मध्ये भाजपाला याची किंमत मोजावी लागेल”, असे खुशाल मुंडे यांनी म्हटले.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी शनिवारी बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला दांडी मारली होती.


हेही वाचा – सुशांतसिंह राजपूतसंदर्भातील व्हिडीओ ट्वीट करत नितेश राणे म्हणतात, न्याय होणारच!

First Published on: January 2, 2023 12:54 PM
Exit mobile version