मध्य रेल्वेवर लोकमान्य टिळक टर्मिनसचे त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मध्य रेल्वेवर लोकमान्य टिळक टर्मिनसचे त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस, पाहा संपूर्ण वेळापत्रक

central railway

रेल्वेने ट्रेन क्रमांक 12107/12108 लोकमान्य टिळक टर्मिनस – लखनौ – लोकमान्य टिळक टेमिनस त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस सीतापूर जंक्शन पर्यंत/येथून चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  ट्रेन क्र. 12107 लोकमान्य टिळक टर्मिनस – सीतापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस ८ जानेवारी २०२२ रोजीपासून सुटणारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.२५ वाजता सुटेल आणि सीतापूरला (लखनौऐवजी) दुसऱ्या दिवशी १७.४० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्र. 12108 सीतापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस ९ जानेवारी २०२२ रोजीपासून सुटणारी सीतापूर येथून (लखनौऐवजी) २०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

• विस्तारानंतर ट्रेन लखनौ (NE) स्टेशनला बायपास करेल, त्याऐवजी ती ऐशबाग येथे थांबेल.
• ट्रेन लखनौ (NE) च्या विद्यमान वेळेनुसार ऐशबागला पोहोचेल आणि निघेल.
• ट्रेन ऐशबाग आणि सीतापूर जंक्शन दरम्यान मोहिबुल्लापूर आणि सिधौली स्टेशनवर थांबेल.
• लोकमान्य टिळक टर्मिनस आणि लखनौ (ऐशबाग) मधील सेवांचे सध्याचे दिवस, थांबे आणि वेळेत कोणताही बदल नाही.

इगतपुरी आणि भुसावळ दरम्यान रोजच्या अनारक्षित गाड्या

इगतपुरी आणि भुसावळ दरम्यान मध्य रेल्वे दररोज अनारक्षित मेमू गाड्या मेल/एक्स्प्रेस शुल्कासह चालवली जाणार आहे.
11119 MEMU ११ जानेवारी २०२२ पासून पुढील सूचनेपर्यंत दररोज ०९.५५ वाजता इगतपुरीहून सुटेल आणि त्याच दिवशी १७.१० वाजता भुसावळला पोहोचेल. तर 11120 MEMU  १० जानेवारी २०२२ पासून पुढील सूचनेपर्यंत दररोज ०७.०० वाजता भुसावळहून सुटेल आणि त्याच दिवशी १५.१० वाजता इगतपुरीला पोहोचेल.

ही गाडी  घोटी, पाडळी, अस्वली, देवळाली, नाशिकरोड, खेरवाडी, कसबे सुकेणे, निफाड, लासलगाव, मनमाड, पानेवाडी, नांदगाव, नायडोंगरी, हिरापूर, चाळीसगाव, कजगाव, नगरदेवळा, गलाण, पाचोरा, परहांडे, महेजी, म्हसवड, शिरसोली, जळगाव आणि भादली येथे थांबेल.  ८ कार मेमू ट्रेन अशी गाडीची संरचना असेल.

वरील ट्रेन्सच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. या गाड्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे, एसओपी चे पालन करावे लागेल.


हेही वाचा –  Dharavi Corona Cases: मुंबईतील धारावीत पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव, रूग्णसंख्या ५०० पार

First Published on: January 7, 2022 11:03 PM
Exit mobile version