Loksabha Election 2024 : जागावाटपाबाबत महायुतीची बैठक; अमोल कोल्हेंचा मतदारसंघ दादांकडे?

Loksabha Election 2024 : जागावाटपाबाबत महायुतीची बैठक; अमोल कोल्हेंचा मतदारसंघ दादांकडे?

पुणे : लोकसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थान एक बैठक पार पडली. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. नुकतेच शिरूरचे विद्यामन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पारडणार म्हणजे पाडणार, अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. यामुळे शिरूर मतदारसंघ अजित पवार आपल्याकडे ठेवणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत आमदार, खासदार आणि काही पदाधिकारी गेले होते. यानंतर अजित पवारांनी महायुतीमध्ये सामील होऊन राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी अमोल कोल्हे हे अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी अमोल कोल्हे देखील अजित पवार गटात सामील झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. पण मी अजित पवार गटात जाणार नसल्याचे अमोल कोल्हेंनी स्पष्ट केल्यानंतर सर्व राजकीय चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

हेही वाचा – Narendra Modi : साईबाबांनी मोदींना बसवलं आहे, ते सगळं व्यवस्थित करतील – सुरेश वाडकर

शिरूरमधून आढळराव पाटील लढण्यास इच्छुक

आठवडाभरापूर्वीच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे पुणे म्हाडाच्या अधक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. आढळराव हे शिरूरमधून लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक आहे, असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे मंगळवारी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत शिरूर लोकसभा मतदारसंघ हा अजित पवारांकडे गेल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत  मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: February 28, 2024 4:44 PM
Exit mobile version